- म्हणून स्रेहलता वसईकरने शेअर केलेत ‘हे’ खास तीन फोटो...; सोशल मीडियावर रंगतेय चर्चा By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 5:04 PM1 / 11स्रेहलता वसईकर ही एक गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री. विशेषत: ऐतिहासिक भुमिकांसाठी खास ओळखली जाणारी. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेत तिने साकारलेली सोयरा बाईसाहेब ही भूमिका प्रचंड गाजली.2 / 11ऐतिहासिक भुमिका साकारणाऱ्या कलाकारांना पारंपरिक लुकमध्ये पाहण्यास प्रेक्षकांचे डोळे सरावले असतात. पण त्यापलीकडे कलाकारांचं एक आयुष्य असतं आणि खऱ्या आयुष्यात स्रेहलता प्रचंड ग्लॅमरस आहे.3 / 11सोशल मीडियावर ती सतत स्वत:चे ग्लॅमरस, बोल्ड फोटो शेअर करत असते. यावरून ती अनेकदा ट्रोलही होते. अलीकडे तिने असेच काही ग्लॅमरस फोटो शेअर केलेत आणि ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली.4 / 11अर्थात यावेळी स्रेहलताने ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिलं. एक खास पोस्ट शेअर करत तिने ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं. पांढऱ्या शॉर्ट ड्रेसमधील तीन फोटो तिने शेअर केले आणि हे तिन्ही फोटो शेअर करण्यामागचं कारण सांगत, ट्रोलर्सला अनोख्या पद्धतीने फैलावर घेतलं.5 / 11कधी कधी असंच कमरेवर हात ठेऊन या ट्रोलर्सबरोबर भांडावं वाटतंंय. त्यांना सांगावस वाटतं, तुमच्यावरील संस्कार तुमच्या कपड्यांवरून नाही तर तुमच्या विचारांमधून कळतात, म्हणून हा पहिला फोटो, असं तिने लिहिलं.6 / 11त्यांच्यात न झालेला बदल पाहून पालथ्या घड्यावर पाणी म्हणत स्वत:चं डोक्यावर हात मारून घ्यावासा वाटतो. मी एक कलाकार आहे आणि माझं एक खासगी आयुष्य सुद्धा आहे तुम्ही समजून घ्याला, अशी आशा करते. पुन्हा सांगते मी रील आणि रिअल लाईफ ही वेगवेगळी ठेवणच पसंत करते, म्हणून हा दुसरा फोटो..., असं तिने लिहिलं.7 / 11हाताची घडी घालून निवांत.....तुम्हा मायबाप प्रेक्षकांना माझी बाजू समजावून सांगण्याची तशी फार गरज नाही हे मला ठाऊक आहे... फक्त, आम्ही कलाकारही माणूस असतो.... वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी भुकेलेला... म्हणून हा तिसरा फोटो असं तिने लिहिलं आहे.8 / 11स्रेहलताने ‘फू बाई फू’मधून तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, ऐतिहासिक भूमिकांमुळे तिला खरी लोकप्रियता मिळाली. स्नेहलताने मराठीसह हिंदी ऐतिहासिक मालिकांमध्येही काम केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई, स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकांमध्ये ती झळकली आहे.9 / 11स्नेहलताने संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात भानू ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचंही चांगलंच कौतुक करण्यात आलं होतं.10 / 11 काही हिंदी मालिकेतून अभिनय साकारत असताना तिने ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय काही शोचे सूत्रसंचालन केलं होतं.11 / 11स्नेहलता वसईकर हिचे माहेरचे नाव स्रेहलता तावडे. गिरीश वसईकर या दिग्दर्शकासोबत लग्नगाठ बांधल्यानंतर ती स्रेहलता वसईकर झाली. तिला शौर्या नावाची एक मुलगी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications