Join us  

Ganeshotsav 2024: सुंदर देखावा तर कोणाची सुरेख वेशभूषा; मराठी सेलिब्रिटींनी शेअर केले लाडक्या बाप्पासोबत Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 3:30 PM

1 / 8
अभिनेता सुबोध भावेने (Subodh Bhave) घरातल्या गणपती बाप्पाचा फोटो शेअर केला आहे. नुकतंच सुबोध कुटुंबासोबत काश्मीर ट्रीपवर जाऊन आला. त्यामुळे यावर्षी त्यांच्याकडे काश्मीरच्या गुलमर्गमधील गंडोलाचा देखावा करण्यात आला आहे.
2 / 8
अभिनेत्री सायली संजीवच्या (Sayali Sanjeev) मुंबईतील घरी बाप्पा विराजमान झाला आहे. गणपतीसोबत सायलीने सुरेख फोटो शेअर केला आहे. हिरव्या रंगाच्या काठापदराच्या साडीत सायलीचं सौंदर्य खुलून आलं आहे.
3 / 8
अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या (Abhidnya Bhave) घरीही गणरायाचं आगमन झालं आहे. त्यांनी गणपतीसाठी बनवलेली आरास लक्ष वेधून घेत आहे. मागे विठ्ठल, फुलांची सजावट आणि खाली मोठ्या अक्षरात वर्कतुंड महाकाय श्लोक लिहिला आहे. तसंच केशरी रंगाच्या साडीत अभिज्ञा सुंदर दिसत आहे. नवऱ्यासोबत तिने हा गोड फोटो शेअर केला आहे.
4 / 8
आपल्या सौंदर्यामुळे सर्वांनाच वेड लावणारी प्रार्थना (Prarthana Behere) यावर्षीही गणेशोत्सवात खुलून दिसत आहे. नथ, पारंपरिक दागिने आणि फिकट रंगाच्या साडीत ती सुरेख दिसत आहे. प्रार्थानानेही बाप्पासोबत फोटो शेअर केले आहेत.
5 / 8
दरवर्षीप्रमाणेच यंदाही सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकरच्या (Mitali Mayekar) घरी गणपती बाप्पा आला आहे.या मराठमोळ्या जोडप्याच्या वेशभूषेने खास लक्ष वेधून घेतलंय. निळ्या रंगाच्या कुर्ता पायजम्यात सिद्धार्थ उठून दिसतोय. तर लाल रंगाच्या साडीत मितालीने प्रेमातच पाडलं आहे.
6 / 8
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या (Sonalee Kulkarni) पुण्यातील घरीही गणपतीची पूजा झाली. सोनालीने दरवर्षीप्रमाणेच यंदाही स्वत: गणरायाची मूर्ती घडवली आहे. सोनालीने शेअर केलेला हा फोटोही अप्रतिम आहे.
7 / 8
अभिजीत खांडकेकर(Abhijeet Khandkekar) आणि सुखदा (Sukhada) या गोड मराठमोळ्या जोडीनेही आपल्या लाडक्या बाप्पासोबत फोटो शेअर केला आहे. नेहमीप्रमाणेच दोघंही अगदी शोभून दिसत आहेत.
8 / 8
काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकलेला सर्वांची लाडकी जोडी प्रसाद जवादे (Prasad Jawade) आणि अमृता देशमुखनेही (Amruta Deshmukh) गणरायाचं स्वागत केलं आहे. निळ्या रंगाच्या साडीत अमृता खूप गोड दिसत आहे. तर प्रसादनेही मॅचिंग आऊटफिट घातला आहे.
टॅग्स :गणेशोत्सव 2024सेलिब्रिटी गणेशसुबोध भावे सायली संजीवप्रार्थना बेहरेसिद्धार्थ चांदेकरअभिजीत खांडकेकर