मराठी कलाविश्वातील 'हे' कलाकार लावत नाहीत त्यांचं आडनाव; जाणून घ्या त्यांचं रिअल Surname
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 14:49 IST
1 / 9'नावात काय आहे', असं शेक्सपिअरचं वाक्य आज जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे व्यक्तीच्या नावापेक्षा किंवा आडनावापेक्षा त्याच्या कर्तृत्वाकडे पाहा हाच अर्थ त्यातून दिसून येतं. विशेष म्हणजे आज कलाविश्वात असे असंख्य कलाकार आहेत जे त्यांच्या नावापुढे आडनाव लावत नाहीत. यात काही जण केवळ आपल्या वडिलांचं नाव लावतात. त्यामुळेच आडनाव न लावणारे मराठी कलाकार कोणते ते जाणून घेऊयात.2 / 9रसिका सुनील - माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. या मालिकेत तिने शनाया ही भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली.3 / 9रसिका तिच्या नावापुढे वडिलांचं म्हणजे रसिका सुनील असं नाव लावते. परंतु, तिचं खरं आडनाव धाबडगांवकर असं आहे.4 / 9अमृता सुभाष - मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाच्या डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी अमृता तिचं आडनाव कधीच लावत नाही. त्यामुळे ती कायम तिच्या वडिलांच्या नावाने म्हणजेच अमृता सुभाष या नावाने ओळखली जाते.5 / 9अमृताचं खरं अडनाव ढेंबरे असल्याचं सांगण्यात येतं. परंतु,संदेश कुलकर्णीसोबत लग्न केल्यानंतर तिचं नाव अमृताने कुलकर्णी असं आहे. मात्र, आजही ती अमृता सुभाष हेच नाव लावते. व याच नावाने ती प्रसिद्ध आहे.6 / 9 सायली संजीव - काहे दिया परदेस मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. मालिकांपासून प्रवास सुरु करणारी ही अभिनेत्री सध्या अनेक चित्रपटांमध्येही झळकल्याचं पाहायला मिळतं. 7 / 9सायलीचं खरं नाव सायली संजीव चांदसारकर असं आहे.8 / 9 ललित प्रभाकर - असंख्य तरुणींच्या गळ्यातलं ताईत असलेला अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेच्या माध्यमातून ललित घराघरात पोहोचला.9 / 9ललित प्रभाकर असं नाव लावणाऱ्या या अभिनेत्याचं खरं नाव ललित भदाणे असं असल्याचं सांगण्यात येतं.