Join us

आता गं बया का....! रिंकू राजगुरूचा नो मेकअप लूक होतोय व्हायरल, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 5:33 PM

1 / 11
रिंकू राजगुरूने नुकताच इंस्टा स्टोरीवर तिचा विना मेकअपमधील फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
2 / 11
रिंकू राजगुरूचा नो मेकअप लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत.
3 / 11
रिंकू राजगुरू नेहमी सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
4 / 11
रिंकू राजगुरूच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.
5 / 11
रिंकू राजगुरू दिवसेंदिवस खूप ग्लॅमरस होत चालली आहे.
6 / 11
रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती.
7 / 11
रिंकूने नुकतेच आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे लंडनमधील शूटिंग पूर्ण केले.
8 / 11
तसेच रिंकू राजगुरू अमोल पालेकर यांच्यासोबत एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.
9 / 11
रिंकू राजगुरू सध्या लॉकडाउनमुळे तिच्या घरी अकलूजला आहे. तिथले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते.
10 / 11
रिंकू राजगुरू शेवटची हंड्रेड या वेबसीरिजमध्ये झळकली होती.
11 / 11
रिंकू राजगुरू इंस्टाग्रामवर ४५.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :रिंकू राजगुरू