Join us

जत्रा : मानधनाबाबत कुशलचा झाला गैरसमज; 90 हजारच्या जागी हातात पडले फक्त 'इतके' पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 2:42 PM

1 / 11
२००५ साली प्रदर्शित झालेला 'जत्रा' मराठीतील लोकप्रिय कॉमेडी सिनेमांपैकी एक आहे.
2 / 11
भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्रिया बेर्डे, कुशल बद्रिके, विजय चव्हाण, क्रांती रेडकर, संजय खापरे अशी या सिनेमाची स्टारकास्ट होती.
3 / 11
केदार शिंदेंचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आजही हा सिनेमा तितक्याच आवडीने पाहिला जातो.
4 / 11
'जत्रा'मधील कलाकारांना या सिनेमाने रातोरात स्टार केलं. कुशल बद्रिकेचा हा पहिलाच सिनेमा होता.
5 / 11
'जत्रा'मधून कुशलची मोठ्या पडद्यावर एन्ट्री झाली होती. पण, या सिनेमासाठी त्याला किती मानधन मिळालं होतं? हे माहितीये का?
6 / 11
खुद्द कुशलनेच 'मॅडनेस मचाऐंगे' या शोच्या मंचावर याचा खुलासा केला आहे.
7 / 11
'या सिनेमात माझं ३० दिवसांचं काम होतं. माझी भूमिकाही मोठी होती. मानधनाबाबत बोलण्यासाठी मी केदार सरांना भेटायला गेलो होतो.'
8 / 11
'केदार सरांनी मला ३ हजार रुपये मिळतील असं सांगितलं. मला वाटलं की मला प्रत्येक दिवसाला ३ हजार मिळणार आहे. म्हणजे ३० दिवसांचे ९० हजार असा हिशोब मी केला होता'.
9 / 11
'मी कॉन्ट्रॅक्टवर सही करण्यासाठी पेपर हातात घेतले. केदार सरांनी मला विचारलं की तू पेपर वाचले आहेस ना? तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे तुझं पॅकेज आहे'.
10 / 11
'३० दिवसांच्या कामासाठी मला ३ हजार रुपये मानधन मिळालं होतं. मला ते खूपच कमी वाटत होते. तेव्हा मी मित्राला फोन करून याबाबत सांगितलं.'
11 / 11
'तेव्हा माझ्या मित्राने मला हा सिनेमा करण्याचा सल्ला दिला होता. पण, या सिनेमाने मला स्टार केलं', असं कुशल म्हणाला.
टॅग्स :कुशल बद्रिकेमराठी अभिनेतासिनेमा