Join us  

अभिनेत्री अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती, आयुष्यात घडला 'हा' मोठा प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 5:55 PM

1 / 7
अभिनय आणि नृत्य यातून कायम प्रेक्षकांची मन जिंकणारी अष्टपैलू अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली अमृता खानविलकर.
2 / 7
अमृताच्या आगामी 'वर्ल्ड ऑफ स्त्री' मधून शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय संगीत आणि नृत्याची अनोखी मैफिल यातून अनुभवयाला मिळणार आहे. त्यामुळे अमृताचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
3 / 7
'वर्ल्ड ऑफ स्त्री'मध्ये अमृतासोबत डान्स गुरु आशिष पाटील आणि १० अफलातून नर्तकांची प्रतिभावान टीम आहे
4 / 7
९० मिनिटांचा अमृताचा हा लाइव्ह ऑडिओ-व्हिज्युअल परफॉर्मन्स भक्ती, सौंदर्य आणि डायनॅमिक एनर्जी (शिवशक्ती) च्या थीम्स नुसार असणार आहे.
5 / 7
अमृता एक अभिनेत्री म्हणून सगळ्यांना माहीत आहे, पण तिच्या नृत्याविष्काराची अनोखी बाजू 'वर्ल्ड ऑफ स्त्री'मधून अनुभवायला मिळणार आहे.
6 / 7
अमृताने याआधी एक कमालीचं पोस्टर तिच्या सोशल मीडिया वरून शेयर केलं होत आणि आता अमृताने 'वर्ल्ड ऑफ स्त्री 'चा टीझर लाँच केला आहे
7 / 7
२४ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबईत NCPA येथे वर्ल्ड ऑफ स्त्री चा प्रीमियर होणार असून प्रेक्षकांना नृत्य, संगीत आणि संस्कृतीच्या अनोख्या उत्सवात मंत्रमुग्ध होण्याची संधी मिळणार आहे.
टॅग्स :अमृता खानविलकरनृत्य