स्वप्न घेऊन मुंबईत आली अन्... ! मराठीतील रांगडी अभिनेत्री स्मिता तांबेबद्दल बरंच काही...!! By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 5:21 PM1 / 10‘द सेक्रेड गेम्स 2’,‘माय नेम इज शीला’ सारख्या वेबसीरिज असो किंवा मग ‘पंगा’सारखा हिंदी चित्रपट वा जोगवा, तुकाराम, देऊळ यासारखे मराठी सिनेमे अभिनेत्री स्मिता तांबेने या सर्व भूमिकांमध्ये अक्षरश: जीव ओतला.2 / 10साता-यात जन्मलेली स्मिता अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आली आणि अपार कष्ट, चिकाटी व ध्यासाने तिने हे स्वप्न पूर्ण केले.3 / 1011 मे 1983 रोजी साता-यात स्मिताचा जन्म झाला. पुण्यात ती लहानाची मोठी झाली आणि मुंबईने तिला ओळख दिली.4 / 10मराठी चित्रपटसृष्टीत स्मिताने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीच. पण बॉलिवूडमध्येही तिने स्वत:ची भक्कम जागा निर्माण केली.5 / 10सिंघम रिर्टन्स, रुख, नूर, डबल गेम आणि पंगा अशा अनेक बॉलिवूड सिनेमात तिने विविधांगी भूमिका साकारल्या.6 / 102009 मध्ये तिने ‘जोगवा’ हा सिनेमा साकारला. या सिनेमातील तिच्या अभिनयाचे कौतुक करताना आजही प्रेक्षक थकत नाहीत.7 / 10सेक्रेड गेम्स आणि माय नेम इज शीला या वेबसीरिजमधील तिच्या अभिनयावरही लोक फिदा झालेत.8 / 10 अभिनयात जम बसवल्यानंतर स्मिता निर्मिती क्षेत्रात उतरली. रिंगींग रेन या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून पुढे दिग्दर्शनातही तिने हात आजमावला.9 / 10स्मिताने अनेक मराठी शॉर्ट फिल्म्सचे दिग्दर्शन केले. अनेक बालचित्रपटही साकारले.10 / 10 2019 मध्ये स्मिताने वीरेन्द्र द्विवेदीसोबत लग्नगाठ बांधली. विरेंन्द्र हा नाट्य कलाकार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications