Join us

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं लेटेस्ट फोटोशूट; पाहा अप्सरेच्या ग्लॅमरस अदा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:57 PM

1 / 10
मराठी मनोरंजन सृष्टीतील 'अप्सरा' म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखलं जातं.
2 / 10
अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोनाली तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते.
3 / 10
नुकतंच सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केलेत. या फोटोशूटची नेटकऱ्यांमध्ये कमालीची चर्चा रंगली आहे.
4 / 10
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सोनाली सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
5 / 10
या ड्रेसवर सोनालीने परिधान केलेला कानातले हा विशेष आकर्षण ठरत आहे. तर केस बांधून तिने हा लूक पुर्ण केलाय.
6 / 10
या फोटोंमध्ये सोनालीचा अंदाज खूपच बोल्ड आणि मोहक दिसतो आहे.
7 / 10
नेटकऱ्यांनी सोनालीच्या व्हायरल फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सची उधळण केली आहे.
8 / 10
सोनालीने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.
9 / 10
'गाढवाचं लग्न', 'क्षणभर विश्रांती', 'अजिंठा', 'मितवा',' नटरंग', पोश्टर गर्ल', 'हिरकणी' या सिनेमांतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
10 / 10
तर याचवर्षी सोनालीनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. 'मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटसृष्टीत झळकली.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी