अभिनेत्री सोनाली कुलकर्णी फिरतेय जपान, शेअर केले सुंदर फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:11 IST
1 / 10मराठी चित्रपटसृष्टीची लोकप्रिय अभिनेत्री आणि लाखो दिलांची धडकन असणारी सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतेय2 / 10सोनालीला विविध ठिकाणी फिरण्याची आवड आहे, विशेषकरुन ती भारताबाहेरील अनेक देशात भटकंती करत असते.3 / 10सध्या सोनाली जपान (Sonalee Kulkarni In Japan) हा देश फिरतेय. तेथील सुंदर फोटो तिनं सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 4 / 10या फोटोत सोनाली जपानमधील आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेताना दिसतेय. 5 / 10सोनाली नेहमीच तिच्या फोटोंना हटके कॅप्शन देत सर्वांचे लक्ष वेधून घेते.6 / 10सोनालीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंना 'Sakura Sakura….Swipe to see Puraaa' असे कॅप्शन दिले आहे.7 / 10सोनालीनं जपानमधील लोकप्रिय फूल 'साकुरा'चे फोटो शेअर केलेत. 8 / 10जपानमध्ये चेरी ब्लॉसमला 'साकुरा' म्हणतात. तेथे हे फूल खूप लोकप्रिय आहे. 9 / 10सोनालीच्या या फोटोवर नेटकरी आणि चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.10 / 10अभिनेत्री लवकरच 'महाराणी ताराराणी' आणि 'रावसाहेब' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.