इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी विशाखा सुभेदार ट्रेनमध्ये विकायची ड्रेस मटेरिअल; वाचा तिची स्ट्रगल स्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 12:25 PM1 / 9मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि तितकीच प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार.2 / 9वेगवेगळ्या भूमिका साकारुन विशाखाने तुफान लोकप्रियता मिळवली. परंतु, फू बाई फू या कार्यक्रमामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली.3 / 9विशाखाने कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमातून कलाविश्वात तिची स्वत:ची ओळख निर्माण केली. परंतु, यश, संपत्ती, पैसा मिळवणाऱ्या विशाखाने सुरुवातीच्या काळात मोठा संघर्ष केला आहे.4 / 9अलिकडेच विशाखाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या संघर्षाविषय़ी भाष्य केलं आहे. एकेकाळी तिने चक्क ट्रेनमध्ये ड्रेस मटेरीअल विकण्याचंही काम केलं आहे.5 / 9मुंबईत राहणाऱ्या व्यक्तीला करिअरपूर्वी ट्रेन पकडावी लागते. तुम्ही दोन्ही गोष्टी वेळेवर पकडल्या याविषयी काय सांगाल? असा प्रश्न विशाखाला विचारण्यात आला होता. त्याचं उत्तर देताना तिने तिच्या स्ट्रगलविषयी सांगितलं.6 / 9अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मी शिक्षिका म्हणून काम करायचे. सोबतच मी आकाशवाणीवरही काम केलं आहे. त्यावेळी मी लोकलमधून प्रवास करायचे. तेव्हा मी होलसेलमधून ड्रेस मटेरिअल, कॉस्मॅटिक्स आणि महिलांच्या गरजेच्या वस्तू खरेदी करायचे. या वस्तू मी आकाशवाणीमधील मैत्रिणी आणि लोकलमधील महिलांना विकायचे, असं विशाखा म्हणाली.7 / 9विशाखाने सुरुवातीच्या काळात बराच संघर्ष केला आहे. मात्र, मेहनतीच्या जोरावर तिने तिचं करिअर घडवलं.8 / 9विशाखाने कॉमेडी शो सोबतच काही सिनेमा आणि मालिकांमध्येही काम केलं आहे. यात ‘फक्त लढ म्हणा’, ‘४ इडियट्स’ आणि ‘अरे आवाज कोनाचा’ (२०१३) या सिनेमांमध्ये काम केलं आहे.9 / 9'ये रे ये रे पैसा’ आणि ६६ सदाशिव या सिनेमांमध्येही ती अलिकडेच झळकली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications