पहिला संसार मोडल्यानंतर या मराठमोळ्या अभिनेत्रींनी केलं नाही दुसरं लग्न, पाहा कोण आहेत त्या? By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 6:00 AM1 / 7सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांचा लग्नानंतर संसार फार काळ टिकू शकला नव्हता. तर पहिल्या लग्नानंतर आजही त्या सिंगल आहेत. चला तर जाणून घेऊयात कोण आहेत या अभिनेत्री.2 / 7अभिनेत्री मानसी साळवीचा सुद्धा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. हेमंत प्रभू यांच्याशी तिने 2005 मध्ये लग्नं केलं होतं. 2016 मध्ये दोघेही वेगळे झाले. त्यांना एक मुलगी सुद्धा आहे.3 / 7अभिनेत्री रुपाली भोसले सुद्धा सिंगल आहे. रुपालीच मिलिंद शिंदे याच्याशी लग्नं झालं होतं 2012 मध्ये ते विवाह बद्ध झाले होते. मात्र काही काळातच त्यांचा घटस्फोट झाला. 4 / 7अभिनेत्री स्नेहा वाघ छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री आहे. स्नेहाचे 2007 साली आविष्कार दार्व्हेकर सोबत लग्नं झालं होतं मात्र काही च काळात त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर स्नेहाने 2015 साली तिने अनुराग सोलंकी याच्याशी विवाह केला मात्र स्नेहाचा हा संसारही फार काळ टिकू शकला नाही. वर्षभरातच ते विभक्त झाले. 5 / 7अभिनेत्री तेजश्री प्रधानचे लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरशी लग्न झालं होतं. प्रेक्षकांमध्ये ही जोडी प्रचंड लोकप्रिय होती. 2014 मध्ये त्यांनी विवाह केला होता. मात्र वर्षभरातच ते विभक्त झाले. 6 / 7अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने 2014 साली प्रेमविवाह केला होता. तब्बल 8 वर्षे डेट केल्यानंतर तिने रोहन देशपांडे याच्याशी लग्न केलं होतं मात्र काही महिन्यानंतरच त्यांचा घटस्फोट झाला. 7 / 7अभिनेत्री तेजस्विनी पंडितने 2012 साली लग्नं केलं होतं. तिचा बालमित्र भूषण भोपचे याच्याशी तिचा विवाह झाला होता मात्र काही महिन्यानंतरच ते विभक्त झाले. आणखी वाचा Subscribe to Notifications