Join us

"जाहिरातीत माझ्या जागी विद्या बालनला रिप्लेस केलं", ऐश्वर्या नारकर म्हणाल्या- "शेवटच्या क्षणी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:05 IST

1 / 10
ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अभिनय आणि सौंदर्याने त्यांनी ९०चं दशक गाजवलं.
2 / 10
९०च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या ऐश्वर्या यांना रिजेक्शनचा सामनाही करावा लागला होता.
3 / 10
रातोरात त्यांना एका जाहिरातीत रिप्लेस केलं गेलं होतं. अखेरच्या क्षणी त्यांना काढून विद्या बालनला घेतलं गेलं होतं.
4 / 10
आरपार या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या यांनी हा किस्सा सांगतिला. त्या म्हणाल्या, 'मी नेहमी कम्फर्ट झोनमध्ये राहूनच काम केलं. त्यामुळे फार रिजेक्शनचा प्रश्न आला नाही'.
5 / 10
'माझ्याकडे काम आलं आणि मी ते करत गेले. पण, मी स्वत:हून फारशी कुणाकडे काम मागायला गेले नाही'.
6 / 10
'पण, जाहिरातीबाबत तसं झालं होतं. मला आठवतंय की एका जाहिरातीसाठी मी ऑडिशन दिली होती'.
7 / 10
'विद्या बालन आणि मी तेव्हा शॉर्ट लिस्ट झालो होतो. बाहेर जाऊन कुठेतरी ती जाहिरात त्यांना शूट करायची होती'.
8 / 10
'क्लाइंटला हवं म्हणून त्यांनी विमानाची तिकीटं वगैरे बूक केली होती. माझ्या हातात तिकिटं होती पण, त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही होल्डवर आहात'.
9 / 10
'आणि मग आदल्या दिवशी रात्री फोन आला की तुमचं नाही तिचं सिलेक्शन झालं. तेव्हा मग ते मनाला खूप लागलं होतं'.
10 / 10
'त्यानंतर मग मी जाहिराती नाही करायचं असं ठरवलं. तुम्ही आधी सांगा की तुमचं सिलेक्शन झालेलं नाही ते चालेल. पण, गृहित धरलेलं मला आवडत नाही'.
टॅग्स :ऐश्वर्या नारकरसेलिब्रिटीविद्या बालन