Join us

अमृता खानविलकरला सोशल मीडियावर नवऱ्याने केले ब्लॉक!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 6:00 AM

1 / 10
सध्या सिनेसृष्टीत लग्नसोहळ्यांचा हंगाम आहे. एकीकडे जोड्या जुळत असतानाच अभिनेत्री अमृता खानविलकरने मात्र तिच्या चाहत्यांना एक धक्का दिला आहे.
2 / 10
अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्राकडे क्युट कपल म्हणून पाहिले जाते.
3 / 10
काही महिन्यांपूर्वीच अमृताने हिमांशु आणि आपल्या मित्रमंडळींसोबत जोरदार वाढदिवस साजरा केला होता. मात्र आता हिमांशुने अमृताला सोशल मीडियावरून ब्लॉक केले आहे.
4 / 10
त्यामुळे त्यांच्यात सगळं आलबेल आहे की, नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
5 / 10
याबद्दलचा खुलासा अमृताने प्लॅनेट मराठीवरील 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॅाक शोमध्ये केला आहे.
6 / 10
अमृताने अनेकदा हिमांशुला ब्लॉक आणि अनफॉलो केले आहे. मात्र यावेळी हिमांशुने अमृताला अनफॉलो केले आहे,असे खुद्द अभिनेत्रीने सांगितले.
7 / 10
त्यांच्यात नेमकं काय घडलं, ते असं का करतात, याचे उत्तर प्रेक्षकांना या शोमध्ये मिळणार आहे.
8 / 10
माझ्या पप्पांनी मला आतापर्यंत डान्स करताना बघितले नसल्याची खंतही यावेळी अमृताने व्यक्त केली.
9 / 10
'पटलं तर घ्या विथ जयंती'मध्ये अमृताने अनेक गोष्टी गंमतीदार किस्से, खटकणाऱ्या गोष्टी शेअर केल्या आहेत.
10 / 10
या गप्पाटप्पांमध्ये दिग्दर्शक ओम राऊतही सहभागी झाला असून अमृता आणि तो ‘बर्गर बडीज’ असल्याचे गुपित त्याने यावेळी सांगितले.
टॅग्स :अमृता खानविलकर