Join us  

Girija Oak ३२५ प्रकारचे गोड पदार्थ! अनंत-राधिकाच्या लग्नात पैठणी नेसलेली गिरीजा म्हणते- "आता रसगुल्ला खाऊ की..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 10:56 AM

1 / 8
Anant Ambani Radhika Merchant Wedding : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला.
2 / 8
बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींबरोबरच अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनला मराठी कलाकारांनीही हजेरी लावली होती.
3 / 8
अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीत अभिनेत्री गिरिजा ओकही सहभागी झाली होती. यावेळी गिरिजाच्या मराठमोळ्या अंदाजाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली.
4 / 8
जांभळ्या रंगाची पैठणी आणि लांब बाह्यांचा ब्लाऊज घालून गिरिजाने मराठमोळा लूक केला होता.
5 / 8
केसांत गजरा माळून आणि खड्यांच्या ज्वेलरीत अतिशय साधा मेकअप करूनही गिरिजाचं सौंदर्य खुलून आलं होतं.
6 / 8
अनंत-राधिकाच्या रिसेप्शन पार्टीतील बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या झगमगत्या सिताऱ्यांमध्ये गिरिजाने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
7 / 8
याचे फोटो शेअर करत गिरिजाने 'अजून एक रसगुल्ला खाऊ की नको...३२५ प्रकारचे गोड पदार्थ...'असं कॅप्शन दिलं आहे.
8 / 8
गिरिजाबरोबरच अभिनेत्री अमृता खानविलकरनेदेखील या वेडिंग रिसेप्शनला हजेरी लावली होती.
टॅग्स :अनंत अंबानीगिरिजा ओकसेलिब्रेटी वेडिंग