हटके आहे अंकुश चौधरीची लव्हस्टोरी, त्याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 6:00 AM1 / 9मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. अंकुशची पत्नी दिपा ही देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 2 / 9सध्या दिपा चौधरी झी मराठी वाहिनीवरील तु चाल पुढं या मालिकेत काम करते आहे. या मालिकेत ती अश्विनीची भूमिका साकारते आहे.3 / 9अंकुश आणि दिपाने २००७ साली लग्न केले आणि आता त्यांना प्रिन्स नावाचा मुलगा देखील आहे. अंकुश आणि दिपा यांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यांनी तब्बल दहा वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले.4 / 9दिपा आणि अंकुश यांचा २३ नोव्हेंबर २००६ रोजी साखरपुडा पार पडला. 5 / 9अंकुश आणि दिपा हे दोघे मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार असले त्यांनी त्यांचा साखरपुडा त्यांनी सगळ्यांपासून लपवून ठेवला होता. मीडियाला देखील याविषयी अनेक दिवसांनंतर कळले.6 / 9अंकुश आणि दिपा एकमेकांना कॉलेज दिवसांपासून ओळखत होते. ते दोघे एमडी म्हणजे महर्षी दयानंद कॉलेजचे विद्यार्थी. आणि त्या दोघांचं प्रेम एकच आणि ते म्हणजे अभिनय आणि रंगभूमी. 7 / 9कॉलेजमध्ये असताना ते दोघेही एकांकिकामध्ये काम करत असत. त्याचदरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. करियर केल्यानंतरच लग्न करायचे असे त्यांनी ठरवले होते. 8 / 9अभिनयक्षेत्रात नाव कमावल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अंकुश चौधरी, केदार शिंदे आणि भरत जाधव ही तेव्हाची लोकप्रिय तिकडी.9 / 9 केदार शिंदेच्या ऑल द बेस्ट या नाटकात अंकुश आणि दिपाने एकत्र काम देखील केले आहे. त्यानंतर दिपा परब आपल्याला अनेक जाहिरातींमधून आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. आणखी वाचा Subscribe to Notifications