अभिनयाव्यतिरिक्त सई ताम्हणकरने या क्षेत्रात केलं पदार्पण, वाढदिवसादिवशी दिली खुशखबर! By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 3:34 PM1 / 9अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर हिंदी आणि मराठी कलाविश्वात आपले स्थान निर्माण केले. तिने नुकताच ३८वा वाढदिवस साजरा केला.2 / 9सई ताम्हणकरने तिच्या वाढदिवसादिवशी तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदवार्ता सांगितली.3 / 9सईने अभिनयाव्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. ती उद्योजिका बनली आहे.4 / 9सई ताम्हणकरने कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. मॅडम एस’ (Madame S) असे तिच्या ब्रॅण्डचं नाव आहे.5 / 9मॅडम एस’ (Madame S) याचा नेमका अर्थ काय होतो, हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. या नावाचा अर्थ “क्वीन ऑफ स्यासी ट्यूड” असा होतो. 6 / 9कपड्याचा ब्रॅण्ड सुरू करण्याची संकल्पना डोक्यात नव्हती, असे सई सांगते. चाहत्यांच्या मनात नुसतं राहायचं नाही तर उरायचं आहे आणि या व्यवसायाच्या निमित्ताने मी हे करू शकते त्यामुळेच मी हा निर्णय घेतला. माझ्या सगळ्या चाहत्यांसाठी हे रिटर्न गिफ्ट आहे, असे ती म्हणाली.7 / 9आपल्या वाढदिवशी व्यवसाय सुरु करणे यासारखा दुसरा मुहूर्त नाही. या मर्चंडाइजला सगळेच खूप जास्त प्रेम देतील यात शंका नाही. मी फक्त कागदपत्रांवर उद्योजिका झाले आहे. पण, यापेक्षा तुम्हा सर्वांचं प्रेम माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. याला तुम्ही सगळेच भरभरून प्रेम द्याल आणि असंच काम करण्यासाठी प्रेरणा द्याल अशी आशा आहे, असे ती सांगते.8 / 9ब्रॅण्डच्या नावाबद्दल सई म्हणाली की, ब्रँडचं नाव काय असावं याचा प्रश्न माझ्या मनात नेहमीच होता. एका जवळच्या मित्राने माझ्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असं नाव सुचवलं आणि यामुळे मॅडम एस ( Madame S ) हे नाव ठेवण्याचा मी निर्णय घेतला. ‘क्वीन ऑफ स्यासी ट्यूड’सारखा माझा स्वभाव आहे यावरूनच मर्चंडाइज नाव ठेवलं.9 / 9आजपासून हा ब्रॅण्ड तुमचा झालाय, असेही सई म्हणते. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सई नागराज मंजुळेंच्या ‘मटका किंग’मध्ये झळकणार आहे. याशिवाय तिच्याजवळ ‘ग्राउंड झिरो’, ‘अग्नी’, ‘डब्बा कार्टेल’ हे प्रोजेक्ट आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications