Join us  

'माझी वाघीण' म्हणत अप्सरा फेम Sonalee Kulkarniनं शेअर केला आईसोबतचा फोटो, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 12:56 PM

1 / 11
सोनाली कुलकर्णी हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.
2 / 11
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.
3 / 11
तसेच सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. जे सोशल मीडियावर चर्चेत येताना दिसतात.
4 / 11
सध्या सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णीच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफचीही चर्चा होते. यात तिच्या आईची चर्चा रंगली आहे.
5 / 11
सोनाली कुलकर्णीने आईसोबतचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. तिच्या आईचं नाव सावी कुलकर्णी आहे.
6 / 11
सोनाली कुलकर्णीने आईसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, आई भवानीला समदी कडे पोहचता येत नाही, म्हणून तर तिने आई बनवली… माझी पहिली जीवलग मैत्रीण, जन्मदाती, घडवणारी, शिकवणारी… सगळ्या चुका पदरात घालणारी. माझी ताकद, बळ, शक्ती, माझी वाघिण.
7 / 11
सोनाली कुलकर्णीने या पोस्टमध्ये सर्वांना सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
8 / 11
सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
9 / 11
सोनाली कुलकर्णी शेवटची तमाशा लाइव्ह चित्रपटात झळकली आहे.
10 / 11
सोनाली कुलकर्णी लवकरच व्हिक्टोरीया चित्रपटात झळकणार आहे.
11 / 11
याशिवाय तिने छत्रपती ताराराणी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी