Join us

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा लेक परदेशात करतो हे काम, जाणून घ्या त्याच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 6:00 AM

1 / 11
2 / 11
बहुतेक करून कलाकारांची मुले ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राकडे वळालेली पाहायला मिळतात. याला अपवाद म्हणून अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या मुलाने म्हणजेच अनिकेत सराफने उत्कृष्ट शेफ होण्याकडे भर दिला आहे.
3 / 11
अनिकेत सराफ हा उत्कृष्ट शेफ तर आहेच परंतु त्याने अभिनय क्षेत्रात देखील यशस्वी पाऊल टाकलेले पाहायला मिळत आहे.
4 / 11
वयाच्या ८ व्या वर्षी शाळेत शिकत असताना अनिकेत सराफने नाटकाांमधून काम केले होते. कॉलेजमध्येही तो नाटकांतून छोट्या मोठ्या भूमिका बजावत होता.
5 / 11
पहिल्यांदाच त्याने (मुकाभिनय) Pantomime: The Wizard Of The Oz या कॅनडाच्या व्यावसायिक नाटकातून अभिनयास सुरुवात केली आहे. या नाटकात त्याने “ग्लिण्डा” (good witch )हे पात्र साकारले आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन देखील स्वतः अनिकेत सराफ यानेच केले आहे.
6 / 11
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना आपल्या मुलाने करिअर म्हणून कोणते क्षेत्र निवडावे याची बंधने कधीच लादली नाही. उलट त्यांना आपल्या मुलाचे नेहमी कौतुकच वाटावे अशीच कामगिरी करून दाखवताना तो दिसत आहे.
7 / 11
अनिकेतला परदेशी भाषा अवगत असून तो फ्रेंच भाषा अगदी अस्खलित बोलतो त्यामुळे स्थानिक लोकांनाही तो तिथलाच असल्याचे वाटते. याशिवाय कॅनडात तो इंग्रजी भाषा शिकवण्याचे काम देखील करत आहे. लहानपणापासूनच अनिकेतला लिखाणाची आवड इंग्रजी भाषेतून कविता लिहिणे हा त्याचा एक छंदच होता.
8 / 11
त्याने स्वतः एक हिंदी शॉर्ट फिल्म देखील तयार करून त्याचे दिग्दर्शन, लेखन केले होते. त्यातील गाणी देखील स्वतःच लिहून ती संगीतबद्ध देखील केली होती.
9 / 11
मध्यंतरी Global Affair नावाने त्याने स्वतःचे हॉटेल देखील उभारले होते.
10 / 11
परदेशात जाऊन काहीतरी करून दाखवायचे स्वप्न मनाशी पक्के केले. तिथे जाऊन वेगवेगळ्या भाषांचे ज्ञान अवगत केले. मग अगथा क्रिस्टी यांच्या “स्पायडर्स वेब”, “माउस ट्रॅप” या परदेशी नाटकातही त्याने महत्वाची भूमिका बजावून अभिनयाकडे वाटचाल सुरू केली.
11 / 11
आज तो अभिनय, लेखन, दिग्दर्शन, शिक्षक, गीतकार यासोबतच एक उत्कृष्ट शेफ म्हणून आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका उत्तमोत्तम बजावताना पाहायला मिळत आहे.
टॅग्स :अशोक सराफनिवेदिता सराफ