Join us

मला वेड लागले प्रेमाचे! आस्ताद आणि स्वप्नालीची ही रोमॅंटिक लव्हस्टोरी पाहून म्हणाल यांना कुणाची नजर लागू नये!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 2:27 PM

1 / 12
आस्ताद काळे व अभिनेत्री स्वप्नाली पाटील
2 / 12
मराठी अभिनेत्री स्वप्नाली पाटीलचा आज वाढदिवस आहे. तिच्या बर्थडे निमित्त जाणून घेऊया तिची आणि आस्ताद काळेची लव्हस्टोरी.
3 / 12
अनेक वर्षांपूर्वी एका मालिकेचा पायलट एपिसोड शूट करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात आस्ताद आणि स्वप्नाली दोघे भाऊ-बहीण होते
4 / 12
या मालिकेत स्वप्नालीची एंट्री झाल्यानंतर या दोघांची मैत्री झाली आणि काहीच महिन्यात आस्ताद स्वप्नालीच्या प्रेमात पडला.
5 / 12
आस्तादने स्वप्नालीला प्रपोज केले नाही. मात्र मनात काय आहे हे बोललेच पाहिजे असा त्याचा स्वभाव आहे
6 / 12
त्यामुळे स्वप्नालीला त्याने तू मला आवडतेस असे सांगितले. त्यावर या गोष्टीचा विचार करू दे असे उत्तर स्वप्नालीने त्याला दिलं आणि जवळजवळ वर्षभरानंतर होकार कळवला होता.
7 / 12
आस्तादने त्याच्या प्रेमाची कबुली बिग बॉस मराठीत दिली, त्यावेळी स्वप्नाली तिच्या कुटुंबियांसोबत हा कार्यक्रम पाहात होती
8 / 12
यावर तिच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया काय होती यावर स्वप्नाली सांगते, मी आणि आस्ताद हे चांगले मित्रमैत्रीण असल्याचे माझ्या घरातल्यांना माहीत होते.
9 / 12
पण मैत्रीपेक्षा आमच्यात अधिक काही आहे याची कल्पना माझ्या आई व वडिलांना नव्हती.
10 / 12
माझ्या आईला थोडासा संशय होता. पण वडिलांना काहीच माहीत नव्हते.
11 / 12
बिग बॉस मराठी कार्यक्रमात माझ्याविषयी बोलेल याची मला थोडीदेखील कल्पना नव्हती.
12 / 12
त्याने कार्यक्रमात कबूल केल्यानंतर माझ्या वडिलांनी फक्त माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिले आणि बोलव आता त्याला भेटायला असे ते म्हणाले....
टॅग्स :मराठीअस्ताद काळे