Photos: गर्लफ्रेंडसोबत मालदीवमध्ये एन्जॉय करतोय भूषण प्रधान, अनुषा दांडेकरचा बिकिनी लूक! By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 1:11 PM1 / 8मराठमोळा अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) सध्या अनुषा दांडेकरसोबत (Anusha Dandekar) रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांचे एकत्रित फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. 2 / 8नुकतंच हे कपल मालदीवला फिरायला गेलं आहे. मालदीवमध्ये क्वॉलिटी टाईम घालवतानाचे काही क्षण अनुषाने सोशल मीडियावर शेअर केलेत.3 / 8४२ वर्षीय अनुषा दांडेकरची फिटनेस कमालीची आहे. मालदीवमध्ये तिच्या बिकिनी लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. निळंशार समुद्राचं पाणी, ते राहत आजूबाजूला सुंदर कॉटेज अशा नयनरम्य ठिकाणी अनुषा काळ्या बिकिनीमध्ये पोज देऊन उभी आहे.4 / 8तर आणखी एका फोटोत व्हाईट ब्लालेस टॉप, प्रिंटेड स्कर्ट मध्ये ती फॅशन गोल्स देत आहे. मालदीव समुद्राचा सुंदर नजाराही आजूबाजूला पाहायला मिळतोय.5 / 8समुद्रकिनारी अनुषा आणि भूषण एकमेकांसोबत घालवत असलेले क्षणही खूप खास आहेत. याचीही झलक अनुषाने पोस्टमधून दाखवली आहे. 6 / 8याशिवाय समुद्रात लावलेल्या झोक्यावर अनुषा उभी आहे. भूषणने तिचा हा परफेक्ट फोटो क्लिक केला आहे. तसंच समुद्रात बोटिंगचाही ती आनंद घेत आहे.7 / 8भूषणसोबत अनुषा ग्लॅमरस लूकमध्ये डिनर डेटलाही पोहोचलेली दिसत आहे. मालदीवमधील रात्र, काळोख, समुद्र आणि दोघांची कँडल लाईट डेट असा परफेक्ट फोटो त्यांनी शेअर केला आहे.8 / 8भूषण आणि अनुषाने काही महिन्यांपूर्वी आलेल्या 'जुनं फर्निचर' या मराठी सिनेमात एकत्र काम केलं. याच सिनेमाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. आणखी वाचा Subscribe to Notifications