'सिनेमात अभिनेत्री फक्त...', प्राजक्ता माळीनं सांगितलं सिनेइंडस्ट्रीतलं धक्कादायक वास्तव By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 6:12 PM1 / 9अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.2 / 9 प्राजक्ता सातत्याने वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. दरम्यान आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. 3 / 9नुकतंच तिने सिनेइंडस्ट्रीत तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले .4 / 9महिला दिनानिमित्ताने प्राजक्ता माळीने खास मुलाखत दिली त्यात तिने सिनेइंडस्ट्री, पुरुषी अंहकाराबद्दल भाष्य केले. 5 / 9यावेळी ती म्हणाली, मी सिनेइंडस्ट्रीत नवीन होते. माझे कोणीही या सिनेइंडस्ट्रीशी निगडीत नव्हते. त्याबरोबर आम्ही पुण्याला असायचो, मग मुंबई-पुणे हा प्रवास अशा बऱ्याच गोष्टी होत्या. 6 / 9 मी इंडस्ट्रीत आल्यावर मला अनेकांनी विविध सल्ले दिले. त्यातील एक सल्ला म्हणजे महिलांनी दिलेले सल्ले पुरुष दिग्दर्शकांना अजिबात आवडत नाही. ते त्यांना पचवता येत नाहीत. त्यामुळे त्यांचा पुरुषी अहंकार दुखावला जातो.7 / 9ती पुढे म्हणाली की, अनेक सहकलाकारांच्या बाबतही मला या गोष्टी सांगण्यात आल्या. अभिनेत्रींनी फक्त सुंदर असावे पण मूर्ख असावे, असे अनेकदा सांगितले जाते. हे मराठी सिनेइंडस्ट्रीत फार कमी आहे. पण इतर सिनेइंडस्ट्रीत हा प्रकार सर्रास घडतो.8 / 9चित्रपटात अभिनेत्री फक्त सुंदर दिसण्यासाठी, नाचण्यासाठी इतकीच मर्यादित असावी. पण आता चित्र बदलत आहे. पण यासाठी तुम्हाला झगडावे लागते आणि मी त्यासाठी कायमच झगडत राहेन.9 / 9 दरम्यान प्राजक्ता माळी लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. मात्र याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications