Daughter's Day : सुप्रिया पिळगावकर यांनी शेअर केले लेकीचे बालपणीचे फोटो, तुम्ही पाहिलेत? By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 5:16 PM1 / 8आज ‘डॉटर्स डे’. जगभर हा दिवस साजरा केला जातोय. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. मराठमोळ्या अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनीही या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीला ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.2 / 8सुप्रिया यांची लेक श्रिया पिळगावकर एक अभिनेत्री आहे. आई-बाबांच्या पावलावर पाऊल ठेवत, ग्लॅमर इंडस्ट्रीत तिनं स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लेकीचं कौतुक असणारचं ना?3 / 8सुप्रिया यांनी आज डॉटर्स डे निमित्त श्रियाचे काही जुने फोटो शेअर करत आठवणी ताज्या केल्या आहेत.4 / 8 श्रिया आणि सुप्रिया यांच्यात खूप खास नातं आहे. या मायलेकी कमी आणि मैत्रिणी जास्त आहेत. दोघीही सतत एकमेकींसोबतचे फोटो शेअर करत असतात. 5 / 8अलीकडे श्रिया शूटिंगनिमित्त गोव्यात होती. त्यामुळे सचिन आणि सुप्रिया श्रियासोबत वेळ घालवण्यासाठी गोवा ट्रिपवर गेले होते. या ट्रिपचे सुंदर फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.6 / 8श्रियाने ‘एकुलती एक’ या मराठी चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती. यामध्ये तिचे सचिन पिळगांवकर हेच तिचे आॅनस्क्रीन बाबा होते. 7 / 8सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे श्रियाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.8 / 8यानंतर ती किंग खान शाहरुखच्या 'फॅन' या सिनेमातही झळकली होती. शिवाय फ्रेंच सिनेमातही तिने काम केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications