Join us

'धडाकेबाज'मधली 'गंगी' आठवतेय? लोकप्रिय मालिकेत करते काम, आता ओळखताही येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 4:56 PM

1 / 8
१९९० साली प्रदर्शित झालेला 'धडाकेबाज' सिनेमा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमातील बाटलीतल्या गंगारामने धमाल आणली होती.
2 / 8
महेश कोठारेंचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, दीपक शिर्के, प्राजक्ता कुलकर्णी, अश्विनी भावे आणि रविंद्र बेर्डे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.
3 / 8
या सिनेमातील गंगी फुलवाली ही भूमिका अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी साकारली होती. या भूमिकेने प्राजक्ता यांना लोकप्रियता मिळवून दिली.
4 / 8
या चित्रपटातूनच त्यांनी सिनेसृष्टीतून पदार्पण केलं होतं. त्यानंतर गुंज, शोध, आग, दामिनी या सिनेमांमध्ये त्या झळकल्या.
5 / 8
काही मालिकांमध्येही त्या दिसल्या होत्या. आई माझी काळूबाई, छत्रीवाली या मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
6 / 8
ठरलं तर मग या मालिकेत अर्जुनच्या आईची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ताच धडाकेबाजमध्ये लक्ष्याची गंगी आहेत, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का?
7 / 8
पण, हे खरं आहे. इतक्या वर्षांत प्राजक्ता यांच्यामध्ये खूप बदल झाला आहे.
8 / 8
प्राजक्ता या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. खऱ्या आयुष्यात त्या खूपच ग्लॅमरस आहेत.
टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटीमराठी चित्रपट