'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम रोहित राऊतच्या होणाऱ्या पत्नीला पाहिलंत का?; ती आहे लय भारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 13:08 IST
1 / 7‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम रोहित राऊत (Rohit Raut ) लवकरच गायिका जुईली जोगळेकरसोबत ( Juilee Joglekar) लग्नबेडीत अडकणार आहे. 2 / 7नुकतेच त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. त्यानंतर ते कधी लग्नबंधनात अडकणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 3 / 7अखेर त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. 4 / 7जुईली जोगळेकर हिने इंस्टाग्रामवर रोहित राऊत सोबतचा फोटो शेअर करत त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले आहे. तिने म्हटले की, चला. दहा दिवस बाकी आहेत. यावरून ते दोघे २३ जानेवारीला लग्नबंधनात अडकू शकतात.5 / 7रोहित व जुईलीच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. या फोटोंवरून रोहित आणि जुईली लवकरच लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.6 / 7२००९ साली ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पवार्चा रोहित राऊत विजेता ठरला होता. त्यानंतर रोहितने गायक म्हणून सिनेइंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. याच शोमध्ये जुईली जोगळेकर ही देखील स्पर्धक म्हणून आली होती.7 / 7तेव्हापासून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले आणि मग प्रेमात. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली दिली आहे.