श्रुती मराठेचा नवरा आहे मराठी कलाविश्वातील हा प्रसिद्ध अभिनेता, सेटवर सुरु झाली होती त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 7:30 PM1 / 9सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. अभिनेत्री श्रुती मराठेचा पतीदेखील प्रसिद्ध अभिनेता आहे. (Photo Instagram) 2 / 9श्रुती मराठेचा नवरा अभिनेता गौरव घाटणेकरच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo Instagram) 3 / 9श्रुती पती गौरवसोबतचे फोटो अनेकवेळा सोशल मीडियावर शेअर करत असते. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. (Photo Instagram) 4 / 9श्रुती आणि गौरवची ओळख 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.(Photo Instagram) 5 / 9गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे. छोट्या पडद्यावरील ‘तुज विन सख्या रे’ या मालिकेतून गौरव घराघरांत पोहोचला होता.(Photo Instagram) 6 / 9गौरवने व्हिसलिंग वुड्स या संस्थतेतून अभिनयाचे धडे घेतले आहेत. तिथे त्याला ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाहाच्या हाताखाली अभिनय शिकता आला. (Photo Instagram) 7 / 9 मराठी सिनेमा आणि हिंदी मालिकांबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतूनही त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.(Photo Instagram) 8 / 9श्रुती मराठेने (shruti marathe) तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. (Photo Instagram) 9 / 9श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे.(Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications