अभिनेते शरद पोंक्षे यांच्या लेकाला पाहिलंत का?; त्याचाही आहे सिनेइंडस्ट्रीशी संबंध, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 07:00 IST
1 / 8सध्या ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये आपण वेगवेगळ्या भूमिका पाहत आहोत. 2 / 8 शरद पोंक्षे यांनी ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये विनायक कानेटकर अतिशय जबरदस्त अशी भूमिका साकारली आहे. त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे. ही भूमिका अभिनेते शरद पोंक्षे यांनी साकारली आहे. 3 / 8अभिनेते शरद पोंक्षे गेल्या अनेक वर्षापासून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. शरद पोंक्षे यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटात काही काम केले आहे. त्यांची नाटके ही मोठ्या प्रमाणात गाजली आहेत. मी नथुराम गोडसे बोलतोय हे त्यांचे नाटक प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे. मात्र, या नाटकाला अनेकांचा मोठा विरोध देखील झाला आहे. 4 / 8शरद पोंक्षे यांचे आपल्या कुटुंबाप्रती अतिशय जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. मुलाचे नाव स्नेह तर मुलीचे नाव सिद्धी आहे.5 / 8शरद पोंक्षेचा मुलगा स्नेह हादेखील वडिलांप्रमाणे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे.6 / 8स्नेह याने नुकताच रिलीज झालेल्या धर्मवीर सिनेमासाठी काम केले आहे.7 / 8धर्मवीर सिनेमाच्या दिग्दर्शकांच्या टीममध्ये स्नेहने प्रवीण तरडे यांच्यासोबत काम केलं. 8 / 8स्नेहला सुद्धा अभिनयाची आवड आहे. त्याने सध्या दिग्दर्शनामध्ये काम करण्याचा पर्याय निवडला असला तरी भविष्यात मोठ्या प्रोजेक्टमध्ये अभिनय करताना दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.