केतकी माटेगावकरच्या आईला पाहिलंत का?; फोटो शेअर करत म्हणाली - 'देवाची पूजा करुन...' By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 11:25 AM1 / 9अभिनेत्री, गायिका केतकी माटेगावकर हिने शाळा, टाइमपास यासह विविध चित्रपटातील अभिनयामुळे रसिकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलेलं आहे. 2 / 9या चित्रपटांतील भूमिकांमुळे एक सोज्वळ अभिनेत्री अशीच ओळख केतकी माटेगावकरच्या फॅन्सच्या मनात आहे.3 / 9केतकी माटेगावकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.4 / 9केतकी माटेगावकर सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते आणि बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. 5 / 9दरम्यान, आता केतकी माटेगावकरने तिच्या आईसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. केतकी माटेगावकरने आईसोबत दिवाळी निमित्ताने फोटोशूट केले आहे.6 / 9तिने फोटो शेअर करत लिहिले की, देवाची पुजा करुन आई मिळवता येत नाही... आईची पुजा करुन देव मिळवता येतो. माझी गोड आई.7 / 9केतकी माटेगावकरच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.8 / 9सोशल मीडियावर केतकी माटेगावकरचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. 9 / 9केतकीने शाळा, टाईमपास, टाईमपास-२, काकस्पर्श, तानी अशा विविध चित्रपटांमधून अभिनय केला आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications