मराठमोळ्या नेहा महाजनच्या बॉयफ्रेंडला पाहिलंत का?, अभिनेत्रीनं शेअर केली रोमँटिक पोस्ट By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 1:36 PM1 / 11कलाकारांच्या प्रोफेशनलसोबत खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. तसेच कलाकारदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतात.2 / 11अभिनेत्री नेहा महाजन हिने व्हॅलेंटाइन डेला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून प्रेमाची कबुली दिली होती. 3 / 11त्यानंतर आता पुन्हा तिने इंस्टाग्रामवर रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. 4 / 11नेहा महाजनच्या बॉयफ्रेंडचं नाव ब्रॅडली ड्युन्स आहे. 5 / 11नेहाने इंस्टाग्रामवर नुकताच त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, हॅप्पी विकेंड लव्हर.6 / 11 या फोटोत नेहा महाजन आणि ब्रॅडली लिफ्टमध्ये दिसत आहे आणि ब्रॅडली तिच्या कपाळावर किस करताना दिसतो आहे.7 / 11त्यांच्या या रोमँटिक फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 8 / 11अभिनेत्री नेहा महाजनने 'कॉफी अॅण्ड बरेच काही', 'निळकंठ मास्तर' व 'वन वे तिकिट' या मराठी चित्रपटात काम केले आहे. मराठी, तमीळ व इंग्रजी चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.9 / 11'जीबून संदेश' या आोरिया फिल्ममध्ये भूमिका केल्या आहेत. 'द पेंटेड हाऊस' या सिनेमातून तिने २०१५ साली मॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 10 / 11ती रणवीर सिंगच्या सिंबा चित्रपटातही झळकली आहे. 11 / 11'बाबू' या चित्रपटात अंकित मोहन, नेहा महाजन यांच्यासोबत रुचिरा जाधवही दिसणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications