एकेकाळी बोअरवेल खोदायचे महेश मांजरेकर; आज करतायेत मराठीसह बॉलिवूडवर राज्य By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 3:58 PM1 / 8मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेता म्हणजे महेश मांजरेकर.2 / 8मराठीसह हिंदी कलाविश्वातही महेश मांजरेकरांनी त्यांचं स्थान निर्माण केलं आहे.3 / 8आज यश, प्रसिद्धी, लोकप्रियता अनुभवणाऱ्या महेश मांजरेकर यांचा हा प्रवास सोपा नव्हता. कलाविश्वात येण्यापूर्वी त्यांनी बराच स्ट्रगल केला आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या या स्ट्रगलविषयी भाष्य केलं.4 / 8अलिकडेच महेश मांजरेकर यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या कामावर भाष्य केलं.5 / 8'सिनेक्षेत्रात येण्यापूर्वी मी कष्टाची काम केली आहेत. 80 च्या दशकात गावोगावी जाऊन बोअरवेल खोदल्या आहेत. जामखेड तालुक्यातही सुमारे ६० ते ७० बोअरवेल खोदल्या आहेत', असं महेश मांजरेकरांनी सांगितलं.6 / 8पुढे ते म्हणतात, 'ज्या गावात आम्ही जायचो तेथील गावकरी आमच्या राहण्याची सोय करायचे. पण काही गावांमध्ये फारशा सुविधा नसायच्या मग गावकरी करतील तिथेच आम्हाला रहावं लागायचं. बऱ्याचदा चांगली सोय नसेल तर आम्ही मुद्दाम गावच्या सरपंचांना पुढच्या गावात जाऊ असा इशारा द्यायचो.'7 / 8आज महेश मांजरेकर यांचं कलाविश्वात मोठं नाव आहे.8 / 8महेश मांजरेकर यांच्या दोन्ही लेकी, पत्नी या देखील कलाविश्वात सक्रीय आहेत. तर, त्यांचा मुलगा व्यावसायिक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications