Join us

मराठीतील या लोकप्रिय अभिनेत्रींचं वय तुम्हाला माहितीये का?, कुणाचं उलटलंय लग्नाचं वय तर कुणी फक्त २१ वर्षांचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 07:00 IST

1 / 9
भाग्य दिले तू मला या मालिकेतील सर्वांची लाडकी कावेरी म्हणजेच अभिनेत्री तन्वी मुंडले. तन्वीचा जन्म ९ मार्च १९९७ला कोकणातील कुडाळमध्ये झाला. ती सध्या २६ वर्षांची आहे. तन्वी अगदी कमी काळातच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली.
2 / 9
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून लोकप्रिय झालेली गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभू. गिरीजाचा जन्म २७ नोव्हेंबर २००० ला गोव्यात झाला होता. गिरीजा सध्या २२ वर्षांची आहे.
3 / 9
मराठी सिनेइंडस्ट्रीत प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा जन्म ५ जानेवारी १९८३ ला वडोदरा, गुजरातमध्ये झाला होता. तर सध्या ती ४० वर्षांची आहे.
4 / 9
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा जन्म १८ मे १९८८ला पुण्यात झाला होता. तर सोनाली सध्या ३४ वर्षांची आहे.
5 / 9
अभिनेत्री रेश्मा शिंदेचा जन्म २७ मार्च १९८७ला मुंबईत झाला होता. तर सध्या ती ३५ वर्षांची आहे. रेश्मा सध्या रंग माझा वेगळा या मालिकेत काम करतेय.
6 / 9
अभिनेत्री अमृता खानविलकरचा जन्म २३ नोव्हेंबर १९८४ ला मुंबईत झाला होता. तर सध्या ती ३८ वर्षांची आहे.
7 / 9
सैराट फेम रिंकू राजगुरूचा जन्म ३ जून २००१ ला अकलूज, सोलापूरला झाला होता. रिंकू सध्या २१ वर्षांची आहे.
8 / 9
अभिनेत्री सई ताम्हणकरचा जन्म २५ जून १९८६ ला सांगलीत झाला होता. तर सई सध्या ३६ वर्षांची आहे.
9 / 9
शिवानी बावकरचा जन्म ११ मार्च १९९१ ला पुण्यात झाला होता. तर सध्या ती ३१ वर्षांची आहे. तिला लागीर झालं जी या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली. सध्या ती झी मराठीवरील लवंगी मिरची मालिकेत पाहायला मिळते आहे.
टॅग्स :सई ताम्हणकरसोनाली कुलकर्णीअमृता खानविलकरप्रार्थना बेहरेशिवानी बावकररिंकू राजगुरूरेश्मा शिंदे