'झापूक झुपूक'मधील सूरज चव्हाणच्या नायिकेला ओळखलंत का? ती आहे प्रसिद्ध अभिनेत्रीची लेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 10:26 IST
1 / 8रिल स्टार ते बिग बॉस मराठी सीझन ५चा विजेता असा प्रवास करणारा सूरज चव्हाण लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्याचा 'झापूक झुपूक' हा सिनेमा २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 2 / 8बिग बॉसच्या घरात असतानाच केदार शिंदे यांनी या चित्रपटासाठी सूरजचा विचार केला आणि त्यालाच या चित्रपटाचा नायक म्हणून जाहीर केले. चित्रपटाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्याला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. 'झापूक झुपूक'मध्ये सूरज चव्हाण अभिनेत्री जुई भागवत सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 3 / 8जुई भागवत सूरज चव्हाणच्या नायिकेची भूमिका साकारत आहे. पण जुई भागवत नक्की आहे तरी कोण ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.4 / 8जुई भागवत हिने अभिनयाचे धडे तिच्या आईकडूनच गिरविले आहेत. जुई भागवत ही प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती भागवतची मुलगी आहे. 5 / 8दीप्ती भागवत या केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर उत्कृष्ट सूत्रसंचालिका, निवेदिका, गायिका तसेच गीतकार आहेत. संगीतकार, गायक मकरंद भागवत यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. जुईलाही लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे.6 / 8झी मराठीच्या महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिएलिटी शोमध्ये जुई सहभागी झाली होता. त्यानंतर तिला तुमची मुलगी काय करते मालिकेत महत्वाची भूमिका मिळाली. 7 / 8त्यानंतर ती ‘लाईक आणि सबस्क्राईब’ आणि गुलकंद या सिनेमात झळकली आहे.8 / 8 आता जुई भागवत झापुक झुपुक चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तिच्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.