'सिंघम' चित्रपटातील शिवा आठवतोय का?, त्याची पत्नी आहे मराठी सिनेइंडस्ट्र्तील ही प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 12:15 PM1 / 11पिळदार शरीरयष्टी आणि आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांना भुरळ घालणारा अभिनेता अशोक समर्थ(Ashok Samarth)ने आज अभिनय क्षेत्रात यशाचे मोठे शिखर गाठलं आहे. 2 / 11अशोक समर्थ यांनी मराठी चित्रपटातदेखील काम केले आहे.3 / 11 त्यांची पत्नीदेखील मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.4 / 11अशोक समर्थ मूळचा तसा महाराष्ट्रातील बारामती येथील आहे. लहानपणापासून त्याला अभिनयासह पहिलवानगी करण्याची देखील आवड होती. १० वी १२ वीमध्ये असताना आपल्या गावी त्याने अनेक आखाड्यांमध्ये खेळ खेळला आहे. त्याने बारामती येथूनच आपल शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि पुढील शिक्षणासाठी पुण्याच्या दिशेने धाव घेतली.5 / 11 शिक्षण सुरू असतानाच त्याला अभिनयाची गोडी लागली होती. पुढे त्याच्यातील नट त्याला मुंबईला घेऊन आला. 6 / 11मुंबई गाठल्यावर सर्वप्रथम त्याने छोट्या पडद्यावर आगण केले. त्याची पहिली मालिका माझिया प्रियाला प्रीत कळेना ही होती. लक्ष्य मालिका तुम्ही सर्वांनी पहिलीच असेल. यात अशोकने अभय कीर्तिकर ही भूमिका साकारली. 7 / 11मराठीतील तब्बल ५ वर्षे चाललेल्या लक्ष्य मालिकेने त्याला मोठी पसंती मिळाली. हीच मालिका त्याच्या अभिनयातील कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली. पुढे त्याने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. त्यानंतर इंसान या चित्रपटातून तो पहिल्यांदा बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर झळकला. 8 / 11पुढे रोहित शेट्टीच्या सिंघम चित्रपटात त्याला अभिनय करण्याची संधी मिळाली. त्याने यामध्ये शिवा नावाच्या खलनायकाची भूमिका साकारली. त्याला मिळालेल्या या संधीच त्याने सोन केलं. त्यानंतर आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत त्याने आजवर मागे वळून पाहिलंच नाही. सिंगममधील त्याचे डायलॉग अजय देवगणच्या आता माझी सटकली या डायलॉग सारखेच फेमस आहेत.9 / 11२०१३ साली आलेला चित्रपट ट्रॅफिक जॅममध्ये त्याची ओळख अभिनेत्री शीतल पाठक बरोबर झाली. या चित्रपटात दोघेही मुख्य भूमिकेत होते. एकत्र काम करता करता त्यांच्यात पक्की मैत्री झाली. त्यानंतर याच मैत्रीला त्यांनी प्रेमाचे नाव जोडले आणि २१ फेब्रुवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. 10 / 11मिलिंद गवळी यांच्यासोबत कृपासिंधू मधून शीतल पाठक नावारुपाला आली. त्यानंतर तिने मंडळी तुमच्यासाठी कायपण, चेहरा, गाव माझं तंटामुक्त, तात्या विंचू लगे रहो, सामर्थ्य, बाय गो बाय अशा अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत ती झळकली आहे. 11 / 11दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत असल्याने आपणही एखादा चित्रपट दिग्दर्शित करावा अशी त्यांची इच्छा होती. आता त्यांचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण जननी या आगामी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अशोक समर्थ करताना दिसणार आहे. चित्रपटातच शूटिंग आता पूर्ण झाले असून या दोघांसह त्यांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications