Join us  

'अग्गंबाई अरेच्चा'मधील ही बालकलाकार आठवतेय का?, आता दिसते खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 3:40 PM

1 / 8
केदार शिंदे दिग्दर्शित अग्गंबाई अरेच्चा या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात एक जागा बनवलेली पाहायला मिळते. २००४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात प्रथमच साताऱ्यातील बावधन गावच्या बगाड यात्रेचे चित्रीकरण दाखवण्यात आले होते.
2 / 8
मन उधाण वाऱ्याचे, उधे गं अंबे उधे, चम चम करता अशी सुरेल गाणी या चित्रपटाला लाभली होती. बायकांच्या मनात बोललेलं रंगाला सर्वकाही ऐकू येतं आणि यातूनच जी धमाल उडते ती या चित्रपटात दाखण्यात आली आहे.
3 / 8
या चित्रपटातूनच तेजस्विनी पंडित हिचे मोठ्या पडद्यावर पदार्पण झाले होते तर केदार शिंदे यांची मुलगी सना हिनेही बालकलाकार म्हणून या चित्रपटातून पदार्पण झाले. सना व्यतिरिक्त आणखी एक बालकलाकार या सिनेमात झळकली होती. ती म्हणजे रमा.
4 / 8
चित्रपटाचा नायक रंगा जिथे काम करतो तिथे ही रमा मुलगा (रामू) बनून चहा देण्याचे काम करत असते. पण रंगाला मुली, महिलांच्या मनातलं ऐकायला येत असल्याने रामू मुलगा नसून मुलगी आहे हे त्याच्या लक्षात येते. आपल्याला कामावरून काढून टाकू नये म्हणून ही रमा रामू बनून पडेल ते काम करते.
5 / 8
ही रमाची भूमिका अभिनेत्री ऐश्वर्या पाटील हिने साकारलेली आहे. ऐश्वर्या पाटील ही आता अभिनेत्री असून ती मराठी सिनेसृष्टीत स्वतःची ओळख बनवताना दिसत आहे.
6 / 8
नुकत्याच निरोप दिलेल्या माझी माणसं या सन मराठीवरील मालिकेत ऐश्वर्याने गिरीजाची भूमिका साकारली होती.
7 / 8
याशिवाय यंटम चित्रपट, पंजाबी ड्रेस ही शॉर्टफिल्म आणि जाऊ द्या ना भाई सारख्या काही नाटकातून तिने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत.
8 / 8
ऐश्वर्या ही मूळची रत्नागिरीची आहे. गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये असताना तिने नाटकातून सहभाग दर्शवला होता. फिल्म एडिटर साई मचकर सोबत ऐश्वर्याने लग्नगाठ बांधलेली आहे.