हीच का ती ‘एलिझाबेथ एकादशी’मध्ये झळकलेली ‘झेंडू’? फोटो पाहून ओळखणंही झालंय कठीण By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 7:00 AM1 / 7‘ए गरम चाय गरम चाय, ए गरम बांगड्या गरम बांगड्या’ हे ऐकताच तुमच्या डोक्यात नक्कीच झेंडू आली असेल. हो तीच ती ‘एलिझाबेथ एकादशी’ मधली झेंडू. 2 / 7२०१४ साली आलेला ‘एलिझाबेथ एकादशी’ हा सिनेमा खूप गाजला होता. 3 / 7 ‘एलिझाबेथ एकादशी’ मध्ये मुख्य भूमिकेत असणाऱ्या ज्ञानासोबतच झेंडू देखील भलतीच भाव खाऊन गेली होती. तिचे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या आवडीचे आहेत.4 / 7चित्रपटात झेंडू अर्थातच ‘मुक्ता’ची भूमिका ही बालकलाकार सायली भंडारकवठेकर हिने साकारली होती. तिने ज्याप्रकारे अभिनय केला, ते पाहून सर्वत्र तिचे कौतुक करण्यात आले होते. 5 / 7आता सायली मोठी झाली असून तिच्यात खूप बदल झाला आहे. आता तिला ओळखणं कठीण झाले आहे.6 / 7अभिनयाशिवाय सायलीला नृत्यामध्ये देखील प्रचंड आवड आहे आणि तिला नृत्यप्रकार भरतनाट्यममध्ये कारकीर्द घडवायची आहे. अगदी लहानपणापासूनच तिने भरतनाट्यमचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. सायली ही मूळची पंढरपूरची. पंढरपूर येथील कवठेकर प्रशालेत शिकत असताना सायली, पुष्कर आणि दुर्गेश यांना चित्रपटाच्या ऑडिशनमध्ये निवडले गेले होते.7 / 7ज्ञानेशची भूमिका साकारणाऱ्या श्रीरंग महाजनने याआधी चिंटू २ या चित्रपटात काम केले होते. श्रीरंग महाजन हा मूळचा पुण्याचा येथूनच त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications