Join us  

कान्समध्ये Flower lady ची कमाल; छाया कदमचा जबरदस्त लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 2:20 PM

1 / 8
सध्या कलाविश्वात आणि चाहत्यांमध्ये छाया कदम हे एकच नाव चर्चिलं जात आहे.
2 / 8
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर छाया कदम यांनी थेट कान्स फिल्म फेस्टिव्हलपर्यंत बाजी मारली आहे.
3 / 8
अलिकडेच छाया कदम यांनी ७७ वा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांना स्टाँडिंग ओवेशन मिळालं.
4 / 8
नाकात नथ आणि आईची साडी नेसून छाया कदम कान्सच्या रेड कार्पेटवर गेल्या. त्यामुळे त्या विशेष प्रकाशझोतात आल्या.
5 / 8
नुकतंच त्यांनी एक फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.
6 / 8
काळ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट असलेल्या गाऊनमध्ये त्यांनी हे फोटोशूट केलं आहे.
7 / 8
या लूकमध्ये त्या प्रचंड कॉन्फिडंट आणि सुंदर दिसत आहेत.
8 / 8
छाया कदम यांचा हा ग्लॅमरस लूक नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण त्यांचं कौतुक करत आहेत.
टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीटिव्ही कलाकारबॉलिवूडकान्स फिल्म फेस्टिवल