Join us

लक्ष्मीकांत बेर्डेंपासून उर्मिला मातोंडकरपर्यंत, या कलाकारांनी वयाची ४०शी उलटल्यानंतर बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 6:00 AM

1 / 10
प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. त्यामुळेच लग्नालाही. नुकतेच बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ६०व्या वर्षी लग्नगाठ बांधली. पण बऱ्याच मराठमोळ्या कलाकारांनीही अगदी उशीरा लग्न केले होते.
2 / 10
मराठी आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनेसुद्धा उशीरा लग्न केले होते. उर्मिलाने मीर मोहसिन अख्तर या कश्मिरी बिझनेसमॅनशी लग्न केलं. उर्मिलाने वयाच्या ४२ व्या वर्षी लग्नगाठ बांधली होती.
3 / 10
२०१६ साली दोघांचही लग्न झालं. या लग्नाची बरीच चर्चा ही झाली होती. उर्मिला सध्या चित्रपटांमध्ये नाही तर राजकारणामध्ये सक्रिय पाहायला मिळते.
4 / 10
प्रसिद्ध अभिनेते आणि मॉडेल मिलिंद सोमण यांनीही उशीरा लग्न केलं होतं. मिलिंद यांचं दोनदा लग्न झालं होतं. हे तुमच्यापैकी अनेकांना माहितच असेल. २०१८ साली मिलिंद यांनी अंकिता कोंवार हिच्याशी लग्नगाठ बांधली. तेव्हा मिलिंद सोमण हे ५२ वर्षांचे होते. तर अंकिता २७ वर्षांची होती. दोघांच्या या वयातील फरकामुळे या लग्नाची विशेष चर्चा झाली.
5 / 10
तर यापूर्वी २००६ साली मिलिंद यांनी फ्रेंच अभिनेत्री आणि मॉडेल मेलिन जम्पो्नइ हिच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या काहीच वर्षांनंतर म्हणजेच २००९ साली दोघांचाही घटस्फोट झाला होता.
6 / 10
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते गिरिष ओक यांनीही उशीरा लग्नगाठ बांधली होती. पल्लवी ओक यांच्याशी लग्न केलं होतं. तर वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांनी हे लग्न केलं. पल्लवी आणि गिरीष यांनी दुर्गा नावाची मुलगीसुद्धा आहे.
7 / 10
दरम्यान ह गिरीष यांचं दुसरं लग्न होतं. यापूर्वी गिरीष ओक यांचं पद्मश्री ओक यांच्याशी लग्न झालं होतं. तर अभिनेत्री गिरीजा ओक ही त्यांची मुलगी. मात्र लग्नाच्या काहीच वर्षानंतर गिरीष आणि पद्नश्री यांनी घटस्फोट घेतला होता.
8 / 10
अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनीही दुसरं लग्न ४०शी नंतरच केलं होतं. लक्ष्मीकांत यांनी अभिनेत्री प्रिया अरुण यांच्याशी लग्न केलं. त्यावेळी लक्ष्मीकांत हे ४४ वर्षांचे होते.
9 / 10
तर यापूर्वी लक्ष्मीकांत यांचं अभिनेत्री रुही बेर्डे यांच्यशी लग्न झालं होतं.मात्र १९९८ साली दीर्घ आजाराने रुही यांचा मृत्यू झाला.
10 / 10
प्रसिद्ध अभिनेते आणि नाटककार काशीनाथ घाणेकर यांनीही ४० शीनंतर लग्न केलं होतं. काशीनाथ घाणेकर यांनी कांचन लाटकर म्हणजेच अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या मुलीशी विवाह केला होता. लग्नावेळी काशीनाथ घाणेकर यांचं वय ५३ होतं. तर या तुलनेत कांचंन फारच लहान होत्या. दोघांच्याही वयातील अंतरामुळे त्यांच्या लग्नाची फार चर्चा झाली होती.
टॅग्स :उर्मिला मातोंडकरलक्ष्मीकांत बेर्डेमिलिंद सोमणकाशिनाथ घाणेकरप्रिया बेर्डेगिरिश ओक