तायडे आणि तिची फसक्लास फॅमिली! क्षिती जोगने शेअर केले 'फसक्लास दाभाडे'च्या सेटवरील मजेशीर फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:55 IST
1 / 7'फसक्लास दाभाडे' सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. 'फसक्लास दाभाडे' सिनेमातील दाभाडे कुटुंब सर्वांच्या पसंतीस उतरतंय2 / 7महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा सिनेमा हाउसफुल्लचे बोर्ड मिळवतोय. सहकुटुंब मराठी प्रेक्षक हा सिनेमा पाहायला गर्दी करत आहे3 / 7अशातच 'फसक्लास दाभाडे'मधील तायडे अर्थात अभिनेत्री क्षिती जोगने सिनेमाच्या सेटवरील खास फोटो शेअर केलेत. यामध्ये कलाकारांचे ऑफस्क्रीन मूमेंट्स पाहायला मिळतात.4 / 7या फोटोत पाहायला मिळतं की, सिद्धार्थ चांदेकर आणि क्षिती जोग ही ऑनस्क्रीन बहीण - भावंडं पेप्सी पिताना दिसत आहेत. दोघांमध्ये मस्तीखोर संवाद पाहायला मिळतोय5 / 7'फसक्लास दाभाडे'मध्ये जेव्हा अमेय वाघचं लग्न होतं तेव्हा त्याची ऑनस्क्रीन ताई क्षिती जोग त्याची पप्पी घेताना दिसते. बहीण-भावांमधील गोड नातं यावेळी दिसतं6 / 7या फोटोत अमेय वाघ त्याची ऑनस्क्रीन आई आणि ताईसोबत मजेशीर पोज देताना दिसते. या फोटोत निवेदिता सराफ पाहायला मिळतात7 / 7'फसक्लास दाभाडे' सिनेमा हेमंत ढोमेने दिग्दर्शित केला असून क्षिती जोग या सिनेमाची सहनिर्माती आहे. सध्या महाराष्ट्रात हा सिनेमा गाजतोय.