Join us  

पूजा सावंतच्या घरी गणरायाचं आगमन, संपूर्ण कुटुंबाने केली मनोभावे पूजा, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2024 11:09 AM

1 / 10
गणरायांच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मनोरंजन विश्वातहीसेलिब्रिटींनी वाजत गाजत गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे.
2 / 10
खास गणेशोत्सवासाठी अभिनेत्री पूजा सावंत ही तिचा पती सिद्धार्थसह ऑस्ट्रेलियावरून भारतात आली आहे.
3 / 10
4 / 10
तिने सोशल मीडियावर घरच्या बाप्पा सोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
5 / 10
या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'गणपती बाप्पांसोबत… आम्हीही आमच्या घरी आलो 🇮🇳 Home coming गणपती बाप्पा मोरया'.
6 / 10
पूजाच्या घरच्या बाप्पाची साध्या पद्धतीने पण रेखीव अशी सजावट केली आहे. त्याच्या या फोटोंना चाहत्यांनी भरभरुन पसंती दिली आहे.
7 / 10
यात तिचे संपूर्ण देशमुख कुटुंब गणरायाच्या भक्तीत लिन झालेले दिसत आहे. यावेळी कुटुंबातील सदस्यांचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला.
8 / 10
लाल रंगाच्या साडीत पुजाचं सौंदर्य खुलून आलं आहे. कुर्ता पायजम्यात सिद्धार्थ उठून दिसतोय. नेहमीप्रमाणेच दोघंही अगदी शोभून दिसत आहेत.
9 / 10
पूजा सावंतचा नवरा हा अभिनेता नसून एका ऑस्ट्रेलियातील एका कंपनीत कामाला आहे.
10 / 10
लग्न झाल्यापासून पूजाही ऑस्ट्रेलियात पतीसोबत राहते आहे. कधी-कधी कामानिमित्त ती महाराष्ट्रात येत असते.
टॅग्स :पूजा सावंतगणेशोत्सव 2024सेलिब्रिटीआॅस्ट्रेलियासेलिब्रिटी गणेश