Join us

Gaurav More: गौरव मोरेच्या झुपकेदार केसाची रंजक कथा, आयुष्याला मिळाली कलाटणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 3:41 PM

1 / 10
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शोमधून अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहोचला असून त्याने प्रेक्षकांच्या मनातही घर केलं आहे.
2 / 10
विनोदीबुद्धी आणि अभिनय कौशल्याने त्याने अल्पावधीतच कलाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. याच कार्यक्रमातून गौरव घराघरात पोहोचला. विनोदाचं अचूक टायमिंग आणि त्यांची हेअरस्टाईल त्याला लोकप्रिय करत गेली.
3 / 10
फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख असलेल्या गौरवने हेअरस्टाईल बदलली अन् त्याचं आयुष्यचं बदलून गेलं की काय, असेच म्हणावे लागेल. कारण, गौरवनेच स्वत: त्याच्या हेअरस्टाईलमागील किस्सा सांगितला आहे.
4 / 10
“एक वेळ अशी होती, जेव्हा मला काम मिळत नव्हतं. म्हणून म्हटलं केस वाढवून बघुया”. मग मी केस वाढवले अन् या झुपकेदार केसांमुळेच मला गुगलची अ‍ॅड मिळाली. तुमचा लूक खूप छान आहे, असं ते म्हणाले. त्यानंतर मला पुढे लूकमुळेच काम मिळत गेलं”, असा किस्सा गौरवने सांगितलं.
5 / 10
गौरवने आपल्या करिअरमध्ये कोणाची साथ मिळाली हेही सांगितलंय. “प्रसाद खांडेकरबरोबर मी पहिल्यापासूनच काम करत होतो. पण, हास्यजत्रेमुळे मला खरी ओळख मिळाली. सोनी मराठी टीम, सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सर यांच्यामुळे मी मोठा झालो”.
6 / 10
“आज मी जो काही आहे तो यांच्यामुळेच आहे. यांना मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. त्यांचा मी खूप मोठा ऋणी आहे”, असंही गौरव म्हणाला. गौरव लवकरच मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त तो नुकताच लंडनला जाऊन आला.
7 / 10
दरम्यान, अभिनय कौशल्याच्या जोरावर गौरवने मराठी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी छाप उमटविली आहे. काही दिवसांपूर्वीच तो चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला होता.
8 / 10
लंडनमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला त्याने भेट दिली. त्याचा फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर करत पोस्ट लिहिली होती. त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली होती.
9 / 10
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना. कोणते आकाश हे, तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे? या भराया आमुच्या, ही पाखरांची वंदना. तुमच्यामुळे आज आमच अस्तित्व आहे. आमच्या श्वासावर तुमचे उपकार आहेत बाबा., अशी पोस्ट गौरवने लिहिली होती.
10 / 10
गौरवने ‘हवाहवाई’ चित्रपटात काम केले आहे. त्याचा फॅन फॉलोव्हिंग मोठा आहे. विनोदी अभिनयाने त्याने रसिकांच्या मनात घर केले आहे.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेतामुंबई