Join us  

Gautami Patil : गौतमी पाटील एका शोसाठी घेते इतके मानधन, महिन्याची कमाई वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 4:59 PM

1 / 8
सबसे कातील, गौतमी पाटील असे अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या गौतमी पाटीलची सगळीकडे खूप क्रेझ आहे.
2 / 8
सोशल मीडिया सेन्सेशन गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात तुडूंब गर्दी असते. पण गौतमी एका कार्यक्रमासाठी किती पैसे घेते माहिती आहे का?
3 / 8
बाळाच्या बारश्यापासून ते बर्थडे पार्टीपर्यंत गौतमी पाटीलची हजेरी सर्वांच्या अंगात एक वेगळाच उत्साह निर्माण करुन जाते. एका कार्यक्रमाचे दीड ते दोन लाख रुपये मानधन घेते.
4 / 8
गौतमी पाटील आणि तिच्या टीममध्ये या मानधनाचं वाटप झालं तरी गौतमी महिन्याला जवळपास ३०-३५ लाख रूपये कमावते.
5 / 8
सुरुवातीला गौतमी लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्य करत असल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र, गौतमीने या सगळ्या गोष्टी लक्षात घेता डान्समध्ये सुधारणा केल्या.
6 / 8
तरीही तिच्या कार्यक्रमांवर अनेकांनी बंदी घालण्याची मागणी केली. या सगळ्याचा तिच्या कार्यक्रमांवर काडीमात्र फरक पडला नाही. तिची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
7 / 8
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनंतर गौतमी पाटील हे नावं चर्चेत आलं.
8 / 8
सोशल मीडिया सेन्सेशन गौतमी पाटील लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. तिची मुख्य भूमिका असलेला घुंगरू हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
टॅग्स :गौतमी पाटील