Genelia Deshmukh : जेवणात तेलाचा वापरच करत नाही जिनिलीया देशमुख, मग स्वयंपाक कसा करतात वहिनी? By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 2:43 PM1 / 7रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हे केवळ सिनेसृष्टीतलेच नाही तर महाराष्ट्राचेही आदर्श आणि लाडके कपल आहेत. महाराष्ट्राच्या या लाडक्या वहिनींचा आज वाढदिवस आहे. 2 / 7रितेशबरोबर लग्न केल्यानंतर जिनिलीया ही पूर्णपणे महाराष्ट्रीयन झाली आहे. तिला महाराष्ट्रीयन पदार्थही आवडतात. 3 / 7अभिनयाबरोबरच जिनिलीया उत्तम स्वयंपाकही करते. तिला स्वयंपाकाची आवड असून जेवणात अजिबात तेल वापरत नसल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला होता. 4 / 7'मला पिटलं भाकरी खूप आवडते. मी हेल्थ कॉन्सियस आहे. आणि महाराष्ट्रीयन फूड हे खूप हेल्दी आहेत. आपण जास्त तेल आणि तूप वापरत नाही'. 5 / 7'मी जेव्हा जेवण बनवते तेव्हा मी जेवणात तेल वापरतच नाही. तेलाऐवजी मी शेंगदाण्याचे कूट वापरते. कारण, त्याला तेल सुटतं. त्याची चवही मग छान लागते', असं जिनिलीयाने सांगितलं होतं. 6 / 7त्याबरोबरच पुरणपोळी आवडत असल्याचंही जिनिलीयाने सांगितलं. तसंच अनेक महाराष्ट्रीयन पदार्थही ती उत्तमरित्या बनवते. 7 / 7जिनिलीयाच्या वाढदिवशी रितेशनेही खास पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications