Join us

Gudhipadwa 2025: मराठी सेलिब्रिटींनी कुटुंबीयांसोबत साजरा केला गुढीपाडवा, पाहा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 11:46 IST

1 / 8
आज संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी गुढी उभारुन गुढीपाडवा साजरा केला जातो. मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते.
2 / 8
दरवर्षी अनेक सेलिब्रिटीही घरोघरी गुढी उभारुन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.
3 / 8
यंदा अनेक सेलिब्रिटी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा करणार आहेत.
4 / 8
'बिग बॉस मराठी' फेम निखिल राजेशिर्के यानेदेखील पत्नीसोबत लग्नानंतरचा हा पहिला गुढीपाडवा साजरा केला.
5 / 8
प्रसाद ओकने त्याच्या कुटुंबीयांसोबत घरी गुढी उभारत हिंदू नववर्षाचा पहिला सण साजरा केला.
6 / 8
सोनाली कुलकर्णीने कुटुंबीयांसोबत गुढीपाडवा साजरा करत चाहत्यांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
7 / 8
प्रवीण तरडेंनेही पत्नी आणि लेकासह गुढी उभारली. याचे फोटो स्नेहल तरडेंनी शेअर केले आहेत.
8 / 8
तर पूजा सावंतने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात पतीसह गुढीपाडवा साजरा केला होता. या आठवणींना तिने उजाळा दिला आहे.
टॅग्स :गुढीपाडवाप्रसाद ओक सोनाली कुलकर्णीप्रवीण तरडेसेलिब्रिटी