Join us  

सचिन-सुप्रिया पिळगावकर यांच्या दत्तक मुलीला पाहिलंत का? श्रियासारखीच आहे सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 2:05 PM

1 / 11
मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन कपल म्हणून सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्याकडे पाहिले जाते. या स्टार कपलच्या पावलांवर पाऊल ठेवत आता त्यांची लेक श्रिया देखील सिनेमा, ओटीटी विश्वात पिळगावकर कुटुंबियांचं नाव मोठे करताना दिसत आहे.
2 / 11
मात्र अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की श्रिया ही सचिन सुप्रिया यांची दत्तक मुलगी आहे का? मात्र असा प्रश्न वारंवार का विचारला जातो. त्याचे कारण आहे सचिन सुप्रिया यांनी काही वर्षांपूर्वी करिश्मा नावाचा एका मुलीला दत्तक घेतल्याचा बातम्या आल्या होत्या.
3 / 11
करिश्मा मखानी ही कुलदीप मखानी या लंडनमधील एका रेस्टॉरंट मालकाची मुलगी होती. सचिन यांची कुलदीपसोबत चांगली मैत्री होती. सचिन यांचं कुलदीप यांचा रेस्टोरंटमध्ये येणंजाणं होते. कालातंराने त्यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते.
4 / 11
याच काळात सचिन आणि सुप्रिया यांची छोट्या करिश्मासोबत ओळख झाली आणि तो गोंडस चेहरा पाहून ते तिच्या प्रेमातच पडले. त्यावेळी तिचं वय ३ वर्षे इतके होते .
5 / 11
करिश्माची आई सतत आजारी असल्याने ती एकटी असायची. तिला आईचे प्रेम मिळत नसल्याचे पाहून एकटा सचिन आणि सुप्रिया यांना राहवले नाही. त्यांनी करिश्माला आपल्यासोबत ठेवण्याचा ठरवले, तो पर्यंत श्रियाचा जन्म झालेला नव्हता
6 / 11
करिश्माचा वडिलांनी देखील तिला पिळगावकर कुटूंबीयांसोबत राहण्याची परवानगी दिली. १९८८ पासून करिश्मा पिळगावकर दाम्पत्यासोबत राहू लागली. इतकेच नव्हे तर करिश्माने सचिन यांचा १९९० साली रिलीज झालेल्या आत्मविश्वास या चित्रपटात लहानशी भूमिका देखील केली होती. मात्र सगळं काही चांगलं चालू असताना अचानक काहीतरी बिनसलं.
7 / 11
सचिन आणि सुप्रिया यांनी अनेक वर्ष करिश्माला आपण दत्तक घेतल्याचा दावा केला होता. २००५ साली एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी करिश्माला तिच्या वडिलांनी तिला किडनॅप करून नेल्याचे आरोप केले. या मुलाखतीमुळे त्या काळात चांगलीच खळबळ माजली होती.
8 / 11
मात्र या मुलाखतीनंतर खुद्द करिश्माने मुलाखत देत आपली आणि आपल्या परिवाराची बाजू स्पष्ट केली होती. करिश्मा म्हणाली, ''सचिन आणि सुप्रिया यांनी कायदेशीररित्या कधीच मला दत्तक घेतले नव्हते. मला माझे खरे वडील कोण आहेत याची लहानपणापासून याबाबत संपूर्ण माहिती होती.
9 / 11
सचिन आणि सुप्रिया यांनी मला आईवडिलांचं प्रेम दिले, मात्र माझ्या वडिलांनी मला किडनॅप केलं नाही तर २ वर्षानंतर त्यांनीच माझ्या वडिलांना मला परत घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर १२ वर्षांनी चित्रपटात करियर करण्यासाठी पुन्हा भारतात आली आणि ६ महिने त्यांच्यासोबत राहिली, मात्र या काळात त्यांनी मला पूर्णपणे स्वीकारलेले मला जाणवलं नाही. ६ महिन्यानंतर पुन्हा त्यांनी मला घर सोडून जाण्यास सांगितलं. या सर्व घटनेचा मला खूप त्रास झाला.
10 / 11
सचिन आणि सुप्रिया यांनी नच बलिये या रिएलिटी शो स्पर्धेत सिम्पथी वोट मिळवण्यासाठी माझा वापर केला असा आरोपदेखील करिश्माने केला. शिवाय जर मी त्यांची दत्तक मुलगी असेन तर इतके वर्ष मी मुंबईत असूनही माझाशी संपर्क करण्याचा प्रयत्न का नाही केला असा सवाल देखील तिने उपस्थित केला.
11 / 11
मात्र या वादानंतर अभिनयात करियर करण्यासाठी मुंबईत आलेल्या करिश्माने गाशा गुंडाळून पुन्हा लंडनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. सध्या ती विवाहित असून लंडन येथे आपल्या परिवारासोबत राहत असल्याचे सांगितले जाते.
टॅग्स :सचिन पिळगांवकरसुप्रिया पिळगांवकर