Join us  

"मी तुझ्यावर खूप प्रेम करतो", प्राजक्ता माळीवरील प्रेमाची या व्यक्तीनं जाहिरपणे दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 9:26 AM

1 / 7
अभिनेत्री प्राजक्ता माळीने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे.
2 / 7
प्राजक्ता माळी महाराष्ट्राची क्रश असून ती तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. ती सतत वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
3 / 7
प्राजक्ता माळीने एखादी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली तर ती काही वेळातच व्हायरल होते. एका क्षणात प्राजक्ताची पोस्ट चर्चेचा विषय बनते. नुकतेच प्राजक्ताने एक फोटोशूट केले ज्याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.
4 / 7
प्राजक्ता माळीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये प्राजक्ता माळी काळ्या रंगाच्या ब्लेजर ड्रेसमध्ये दिसते आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. इतकेच नाही तर एका चाहत्याने तिला प्रपोझही केले.
5 / 7
एका चाहत्याने लिहिले की, ब्यूटी क्वीन स्वर्गाची आणि माझ्या हृदयाची आणि आत्मा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो प्रिय प्राजू आणि या ड्रेसमध्ये सुंदर आणि गोंडस दिसत आहे आणि माझे व्हॅलेंटाईन हार्ट. या चाहत्याची कमेंट सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
6 / 7
आणखी एका चाहत्याने म्हटले, Ohhh कोई तो रोक लो, तर आणखी एकाने लिहीलंय, किती सुंदर तो चेहरा तर दुसऱ्या चाहत्याने म्हटलंय, किती क्युट पोझ दिले आहात तुम्ही आणि माफ करा खूप उशिराने कमेंट करतोय.
7 / 7
आणखी एक नेटकरी म्हणाला, विश्वातील सर्वात सुंदर स्त्री आणि पृथ्वीवरील सर्वात सुंदर स्मित तू किती सुंदर आहेस तू माझ्या हृदयाची राणी आहेस मी तुझ्यावर प्रेम करतो मॅडम मी तुझा सर्वात मोठा चाहता आहे .
टॅग्स :प्राजक्ता माळी