सायली संजीवचं आडनाव माहितीये का? 'या' कारणामुळे लावते फक्त वडिलांचं नाव By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 6:37 PM1 / 12'काहे दिया परदेस' या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.2 / 12या मालिकेच्या माध्यमातून सायलीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. त्यामुळे आज तिने मालिकांसह सिनेमांमध्येही काम केलं आहे.3 / 12सायलीचा बस्ता हा सिनेमा विशेष लोकप्रिय झाला. इतकंच नाही तर गोष्ट एका पैठणीची हा सिनेमाही तिचा गाजला.4 / 12सायलीच्या गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे.5 / 12सायलीने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. परफेक्ट पती या हिंदी मालिकेत ती झळकली होती.6 / 12सायली आज कलाविश्वात सायली संजीव या नावाने ओळखली जाते. मात्र, तिचं आडनाव फारसं कोणाला माहित नाही.7 / 12सायलीने कलाविश्वात येण्यापूर्वी तिचं आडनाव हटवून केवळ वडिलांचं नाव लावण्यास सुरुवात केली.8 / 12त्यामुळेच सायली संजीवचं संपूर्ण नाव काय ते जाणून घेऊयात.9 / 12सायलीच्या वडिलांचं नाव संजीव आहे. त्यामुळे सायली संजीव असं नाव ती लावते.10 / 12सायलीचं आडनाव चांदोस्कर आहे. परंतु, तिला एवढं मोठं आडनाव नको होतं.11 / 12आपलं नाव लहान असावं असं तिला वाटायचं त्यामुळे तिने आडनाव हटवून केवळ वडिलांचं नाव लावण्यास सुरुवात केली.12 / 12सायलीने 'सातारचा सलमान', 'एबी आणि सीडी', 'मन फकिरा', 'दाह', 'बस्ता', 'झिम्मा', 'हर हर महादेव', 'उर्मी' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications