अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी 'हे' कलाकार करायचे इथे नोकरी By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 4:20 PM1 / 8मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. यात अनेक कलाकारांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एका साध्या नोकरीपासून केली आणि त्यानंतर कलाविश्वात पदार्पण केलं. त्यामुळेच अभिनयापूर्वी सर्वसामान्यांप्रमाणे नोकरी करणारे कलाकार कोणते ते पाहुयात.2 / 8सुबोध भावे - बायोपिक म्हणजे सुबोध भावे असं काही काळापूर्वी एक समीकरण तयार झालं आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारा सुबोध एका प्रायव्हेट कंपनीमध्ये सेल्स विभागात नोकरी करत होता.3 / 8किरण गायकवाड - 'लागीरं झालं जी', 'देवमाणूस' या मालिकांमध्ये झळकलेला अभिनेता म्हणजे किरण गायकवाड. उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता एकेकाळी पुण्यातील महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीला होता. परंतु, त्याच्यातील कलाकार त्याला स्वस्थ बसू देईना. अखेर त्याने कलाविश्वाची वाट निवडली.4 / 8रुक्मिणी सुतार - देवमाणूस या मालिकेत सरु आजीची भूमिका साकारणाऱ्या रुक्मिणी सुतार या कलाविश्वात येण्यापूर्वी सरकारी सेवेत रुजू होत्या. मात्र, कालांतराने त्यांनी या नोकरीला सोडचिठ्ठी देत कलाविश्वात पदार्पण केलं.5 / 8गायत्री बनसोडे - देवमाणूस मालिकेतील आणखी एक कलाकार म्हणजे गायत्री बनसोडे. या मालिकेत तिने रेश्मा ही व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेशिवाय ती जेव्हा गर्लफ्रेंड शिव्या देते’ ही या वेब सीरिजमध्येही झळकली होती. गायत्री यापूर्वी एका कंपनीत सेल्स डिपार्टमेंटमध्ये नोकरी करत होती.6 / 8सोनाली पाटील - बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व सध्या गाजवत असलेली स्पर्धक म्हणजे सोनाली पाटील. देवमाणूस या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सोनाली अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी सिनिअर कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती.7 / 8माधवी निमकर - कलाविश्वात येण्यापूर्वी माधवी एका कंपनीत काम करत होती. कंपनीत काम सांभाळून ती अभिनयाची आवडही जपत होती.8 / 8रुपाली भोसले - आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत असलेली रुपाली भोसलेचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. आपल्या कुटुंबास हातभार लागावा म्हणून तिने अनेक ठिकाणी काम केलं आहे. तिने एका कंपनीत रिसेप्शनिस्ट म्हणूनही काम केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications