गौतमीमुळे पुन्हा एकदा झालं 'मार्केट जाम'; पिवळ्या सिल्कच्या साडीत केलं जबरदस्त फोटोशूट By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 3:51 PM1 / 7प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही तिच्या अदांनी आणि नृत्यांनी चाहत्यांना घायाळ करत असते. आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये गौतमी तिची नृत्यशैली सादर करत असते. 2 / 7सध्याच्या घडीला पाहायला गेल्यास तरुणाईमध्ये गौतमीची क्रेझ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. लोकप्रियतेच्या बाबतीत गौतमी पाटील कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. 3 / 7गौतमी पाटीलच्या 'माझा कारभार सोपा नसतोय रं', 'दिलाचं पाखरू', 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम', 'पाटलांचा बैलगाडा' या गाण्यांना प्रेक्षकांनी खूपच चांगली पसंती मिळाली आहे.4 / 7विभत्स हावभाव तसेच आपल्या नजाकतीने प्रेक्षकांवर तिने चाहत्यांना भूरळ घातली. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. 5 / 7सोशल मीडियावर नाही तर ज्या कार्यक्रमात ती जाते, तिथे तिला पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करताना दिसतात. तिची एक अदा पाहण्यासाठी लाखोंची गर्दी होते. 6 / 7सोशल मीडियावर गौतमी नेहमीच सक्रिय असते. त्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केलेत. 7 / 7पिवळ्या रंगाच्या सिल्क साडीत गौतमीचं सौंदर्य अगदी खुलून आलंय. फोटोंमधील तिचा साधा, सालस लूक पाहून नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. आणखी वाचा Subscribe to Notifications