महाराष्ट्राला हसवून हसवून वेड लावणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डेंचे 'हे' दर्जेदार चित्रपट एकदा पाहाच By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 3:05 PM1 / 9धुम धडका हा 1985 साली प्रदर्शित झाला. यात महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि इतर कलाकार आहेत. हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. 2 / 9दे दना दन हा १९८७ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. 3 / 9२३ सप्टेंबर १९८८ दिवशी राज्यात सर्वत्र ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. एवढी वषे उलटली तरी या चित्रपटाची जादू आजही कमी झालेली दिसत नाही. ह 4 / 9'हमाल दे धमाल' मधील हा चित्रपट सर्व मराठी रसिकांच्या मनामनात घर करुन राहिला आहे. 1989 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुम्ही यूट्यूब या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.5 / 9'बाळाचे बाप ब्रह्मचारी' हा सुपरहिट चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना आता पाहता येणार आहे.6 / 9 एका पेक्षा एक हा चित्रपट तुम्ही यूट्यूब या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.7 / 9धडाकेबाज हा १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. 'धडाकेबाज' चित्रपट आजही रसिकांच्या चांगलाच लक्षात आहे. चित्रपटाची कथा आणि कलाकारांचा दर्जेदार अभिनयाने या चित्रपटाने रसिकांची पसंती मिळवली होती. हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. 8 / 9शेम टू शेम हा चित्रपट 1991 साली प्रदर्शित झाला होता. ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना आता हा सिनेमा पाहता येणार आहे.9 / 9 १६ एप्रिल १९९३ मध्ये 'झपाटलेला' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला तुफान लोकप्रियता मिळाली होती. हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications