Join us

पहिल्याच नजरेत मधुराच्या प्रेमात पडला, मिळाला नकार; मिस्टर अँड मिसेस साटमची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 1:05 PM

1 / 8
ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप वेलणकर यांची लेक मधुरा वेलणकरही (Madhura Velankar) नावाजलेली अभिनेत्री आहे. हापूस, एक डाव धोबीपछाड, गोजिरी अशा काही सिनेमांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मराठी मालिकांमध्येही तिने अभिनयाचा ठसा उमटवला.
2 / 8
मधुराचं माहेर आणि सासर दोन्हीही मनोरंजनससृष्टीशी निगडित आहे. तिचे वडील तर अभिनेते आहेतच शिवाय तिचे सासरे हे सीआयडी फेम अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) आहे. त्यांचा मोठा मुलगा अभिजीत साटमशी (Abhijeet Satam) तिने लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाला २० हून अधिक वर्ष झाली. तर मिस्टर अँड मिसेस साटमची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.
3 / 8
अभिजीत मधुराला पाहताच क्षणी प्रेमात पडला होता. तिला मनातलं सांगण्यासाठी अभिजीतने खूप प्रयत्न केले होते. मात्र मधुराने आधी त्याला नकार दिला होता. मग अभिजीतने नकार होकारात कसा बदलला हे देखील खूप इंटरेस्टिंग आहे.
4 / 8
मधुरा रुपारेल कॉलेजमध्ये शिकत होती. कॉलेजच्या दिवसात ती अनेक नाट्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. त्याचवर्षी अभिजीतला पारितोषिक मिळाले होते. दरम्यान पारितोषिक मिळाल्याचा आनंद वेगळा असला तरी त्या दिवशी त्याने मधुराला पहिल्यांदा बघितले होते आणि तो तिला पाहताच क्षणी प्रेमात पडला होता.
5 / 8
मधुराबाबत माहिती काढायची म्हणून त्याने मित्र उमेश कामतला सांगितले. तेव्हा उमेश मधुराचा सिनिअर होता. नंतर उमेशने मधुराबद्दल सर्व माहिती अभिजीतला दिली. मधुरा तिचा प्रोजेक्टचा भाग म्हणून सेलिब्रिटींच्या मुलाखती घ्यायची. दरम्यान तिला अभिनेते शिवाजी साटम यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली.
6 / 8
मुलाखत पार पडल्यानंतर शिवाजी साटम यांचा छोटा मुलगा अनिरुद्ध साटम तिला भेटला. अनिरुद्धने तिला सांगितलं की माझा भाऊ अभिजीतला तुझ्याशी बोलायचं आहे त्याचं काम आहे. असं म्हणत त्याने मधुराचा पेजर नंबर घेतला. नंतर अभिजीतने मधुराला भेटायला बोलावलं. पण ती तिथे गेली नाही.
7 / 8
मग अचानक अभिजीत तिच्या घरी जाऊन पोहोचला. त्याला अचानक असं समोर बघून आधी तिला राग आला. पण याउपर अभिजीतने थेट तिला प्रपोजच केले. तेव्हा तिने साफ नकार दिला होता. मात्र त्यांच्यातील मैत्री कायम राहिली.
8 / 8
मित्र म्हणून किंवा कामानिमित्त का होईना दोघांच्या भेटीगाठी व्हायच्या. तेव्हा मधुरा अभिजीतला जवळून ओळखू लागली. एक दिवस अभिजीतने तिला पुन्हा प्रपोज केले. तोपर्यंत मधुराच्याही मनात अभिजीतसाठी खास जागा निर्माण झाली होती. मग काय यावेळी तिने अभिजीतला होकार दिला.
टॅग्स :मधुरा वेलणकरपती- जोडीदारदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टमराठी अभिनेताशिवाजी साटम