Join us

रुबाब!! डोक्यावर फेटा अन् हटके शर्ट आकाश ठोसरचा नवा लूक चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 8:00 AM

1 / 9
'सैराट' या पहिल्या चित्रपटातून प्रेक्षकांना आपलंसं करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे आकाश ठोसर. उत्तम अभिनयाच्या जोरावर आकाशने प्रेक्षकांची मनं जिंकली.
2 / 9
'सैराट'च्या यशानंतर आकाश 'झुंड' या बहुचर्चित चित्रपटातही झळकला. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली.
3 / 9
गेल्या काही काळामध्ये आकाशचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. त्यामुळे अनेकदा तो त्याचे स्टायलिश फोटो शेअर करत असतो.
4 / 9
झुंडच्या प्रमोशनवेळी आकाश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय झाल्याचं पाहायला मिळालं. तेव्हापासून तो सातत्याने नेटकऱ्यांच्या भेटीला येत आहे.
5 / 9
आतापर्यंत आकाशने इन्स्टाग्राम व फेसबुकवर असंख्य पोस्ट केल्या आहेत. त्यातलीच त्याची एक पोस्ट सध्या चर्चेत येत आहे.
6 / 9
अलिकडेच आकाशने एक नवं फोटोशूट केलं असून यात तो रुबाबदार अंदाजात दिसून येत आहे.
7 / 9
डोक्यावर फेटा आणि कलर्सफूल शर्ट अशा लूकमध्ये त्याने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.
8 / 9
आकाशच्या प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत असतो. तसाच प्रतिसाद त्याच्या या फोटोलादेखील मिळत आहे.
9 / 9
आकाशच्या प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत असतो. तसाच प्रतिसाद त्याच्या या फोटोलादेखील मिळत आहे.
टॅग्स :आकाश ठोसरसेलिब्रिटीसिनेमाझुंड चित्रपट